Today : 18:10:2019


जिओची मोफत कॉलची सेवा होणार बंद !

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
नवी दिल्ली :
प्रतिस्पर्धी नेटवर्क म्हणजेच एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांच्या मोबाईलवर रिलायन्स जिओच्या नंबरवरून फोन केल्यास ग्राहकांना लवकरच सहा पैसे प्रतिमिनिट शुल्क द्यावे लागणार आहे. जिओ मोबाईलवरून आतापर्यंत कोणत्याही नेटवर्कवर किंवा लँडलाईनवर फोन करणे मोफत होते. पण त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून जोपर्यंत इंटरकनेक्ट युसेज शुल्क पूर्णपणे माफ केले जात नाही. तोपर्यंत ग्राहकांना इतर नेटवर्कवर फोन केल्यास त्याचे शुल्क द्यावे लागेल. पण त्याबदल्यात ग्राहकांना तेवढ्याच किमतीचा जास्तीचा डेटाही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. रिलायन्स जिओने गेल्या तीन वर्षांमध्ये इंटरकनेक्ट युसेज शुल्क म्हणून सुमारे १३,५०० कोटी रुपये इतर नेटवर्क कंपन्यांना दिले आहेत. सध्या दिवसाला जिओच्या मोबाईलवर २५ ते ३० कोटी मिस्ड कॉल येतात. इतर नेटवर्कला जिओवरून फोन करणे मोफत असल्यामुळे दुसरे नेटवर्क वापरणारे ग्राहक जिओच्या नंबरवर मिस्ड कॉल देतात. यानंतर जिओच्या नंबरवरून इतर नेटवर्कला प्रतिदिन ६५ ते ७० कोटी मिनिटांचे फोन केले जातात. वास्तविक हे ६५ ते ७० कोटी मिनिटांचे कॉल बाहेरच्या नेटवर्कवरून जिओच्या क्रमांकावर येणारे असायला हवेत. पण तसे होत नसल्यामुळेच इंटरकनेक्ट युसेज शुल्क वाढते. कोणतेही शुल्क जिओ ते जिओ, जिओ ते लँडलाईन त्याचबरोबर इनकमिंग कॉल्स यांच्यावर असणार नाही. हे सर्व कॉल्स मोफत असतील, असे रिलायन्स जिओने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप, फेसटाईमचा वापर करून केलेले कॉल्सही मोफत असतील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
News - Mumbai | Posted : 2019-10-09


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur