Today : 18:10:2019


आदर्श आचारसंहितेसाठी नागरिक वापरणार सी व्हिजिल अस्त्र

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
चंद्रपूर :
निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी "सी व्हिजिल" या ॲपची निर्मिती भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. पूर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे. तसेच सबळ पुरावा अभावी संबंधितावर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन ॲपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत. "सी व्हिजिल" हे ॲप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नाविन्यपूर्ण अस्त्र आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. हे ॲप "युजर फ्रेंडली" असून ॲपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. यातील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही अँड्रॉईड स्मार्टफोन वरून या ॲपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येऊ शकते.

तीन टप्प्यात होणार तक्रार निवारण

आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा दोन-तीन मिनिटाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. भौगोलिक माहिती प्रणाली द्वारे (जीपीएस) स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. नंतर त्या तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात, प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. "सी व्हिजिल" द्वारे आपली ओळख लपून सुद्धा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाईल क्रमांक आणि इतर प्रोफाइल तपशील या प्रणालीवर पाठवले जात नाही. त्यामुळे निनावी तक्रारीबाबत तक्रारकर्त्यास पुढील स्थिती, संदेश मिळणार नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई होणार आहे.

नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठवण्यात येईल. त्यानुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या 'जीव्हीआयजीआयएल अन्वेषक' नामक जीआयएस आधारित मोबाइल अँप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनीटाच्या आत पोहोचणे अपेक्षित आहे. संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास आणि तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्यासंबंधीचा अहवाल ॲपद्वारेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठविला जाईल.  हा कालावधी 30 मिनिटांपेक्षा अधिक नसेल.

भरारी पथकाने तक्रारीवर कारवाई केल्यानंतर क्षेत्रीय अहवाल तपास पथकाने ॲपद्वारे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवल्यावर त्या घटनेतील तथ्य पुरावा आणि अहवालाच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकारी ती तक्रार रद्द करावी, की निकाली काढावी अथवा पुढे पाठवायची याचा निर्णय घेतील. त्या तक्रारीत तथ्य आढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टल वर माहिती पाठवण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटाच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रार कर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश पाठवला जाईल.

"सी व्हिजिल" चा दुरुपयोग होऊ नये म्हणून

 "सी व्हिजिल" ॲपचा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्याच्या भौगोलिक सिमांतर्गत करता येईल. फोटो अथवा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर "सी व्हिजिल" वापरकर्त्यास केवळ पाच मिनिटांचा अवधी मिळेल.   हे ॲप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी देणार नाही. ॲपवरून क्लीक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतनही करता येणार नाहीत. एक सारख्या तक्रारी दरम्यान किमान पाच मिनिटांचा विलंब लागतो.  जिल्हा नियंत्रण कक्ष भरारी पथकाला नेण्याआधी डुप्लिकेट फ्रिवोलेस आणि असंबंधित प्रकरणे रद्द करण्याचा पर्याय आहे. या ॲपचा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाची संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार. याशिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मुख्य वेबसाईटचा तसेच 1800 111 950 किंवा 1950 या क्रमांकावर संपर्क करावा. चंद्रपूरमध्ये 1950 या क्रमांकावर संपर्क करून आपल्या मतदान संदर्भातील माहिती घेण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून आपण  मतदार आहात अथवा नाही व त्या संदर्भातील अन्य माहिती देखील या क्रमांकावरून मिळणार आहे.




News - Chandrapur | Posted : 2019-10-09


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































मोहाडी (भंडारा) येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न (मोठया संख्येत युवा मुला - मुल

2018-01-07 | News | Bhandara

विदर्भ टाईम्स न्युज / भंडारा
भंडारा, प्रफुल बानासु