Today : 05:06:2020


कलावर्त नॅशनल कलास्पर्धेत नवरगाव अव्वल

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :
कलावर्त न्यास नॅशनल आर्ट काँटेस्ट उज्जैन द्वारा आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत यावर्षी सुद्धा नवरगावच्या श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी आपली छाप सोडली आहे. कलाशिक्षक प्रशिक्षण द्वितीय वर्गाची प्रणाली मडावी हिला रोख पाच हजार रुपयांचा पहिला पुरस्कार प्राप्त झाला असून रेखा व रंगकला अंतिम वर्षाचा निखिल आत्राम याला रोख चार हजार रुपयांचा द्वितीय आणि कला शिक्षक प्रशिक्षण वर्गाची पूजा मेश्राम हिला तीन हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रेखा व रंगकला शाखेचेच हरीश चौधरी आणि रोहित बन्सोड ह्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झालेले आहेत. उज्जैन येथे ही स्पर्धा दर वर्षी राबविण्यात येते त्यात भारतातून हजारो विध्यार्थी सहभागी होतात. डिसेंम्बर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कलावर्त न्यास कलावंत संमेलनात सर्व यशस्वी कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर आणि प्रा अतुल कामडी, प्रा. श्वेता पोइनकर, लक्ष्मीकांत लेंझे यांनी अभिनंदन केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2019-10-09


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur