Today : 05:07:2020


मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नाभिक समाज आक्रमक माफीनाम्याची केली मागणी सर्वत्र निषेध

विदर्भ टाईम्स न्यूज
सैय्यद मूम्ताज़ अली, गडचांदुर :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल वापरलेल्या अपशब्दामुळे संपूर्ण नाभिक समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळत असुन याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. ठिक ठिकाणी दुकाने व इतर व्यवसाय बंद करून नाभिक समाज बांधव या वक्तव्याचा निषेध व मुख्यमंत्र्यांच्या माफीनाम्याची मागणी करीत आहे.
     "ज्या प्रकारे एक न्हावी आपला मित्र असतो, तो काय करतो, जर तीन-चार बसले असतील तर एकाला लावतो त्याची अर्धी कापतो, दुसर्‍याची अर्धी कापतो, ग्राहक पळुन जाऊ नये म्हणून तिसऱ्याची शेंडी कापतो" असे वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी पुणे जिल्ह्यातल्या पाटस ता. दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी नाभिक समाजाला उद्देशून व यांच्या व्यवसायाबद्दल केले होते. 
     या वक्तव्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असून याचा निषेध करत मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्रगतीशील नाभिक बहुउद्देशिय मंडळ गडचांदुरच्या पदाधिकारी नितीन नागमोते, अमोल चौधरी, गोपाल धाबेकर, अतुल नागमोते, उमेश लांडगे, अंकुश दैवलकर विनोद कडूकर, गजानन राजुरकर, किशोर धाबेकर सह इतर समाज बांधवांनी तहसिलदार कोरपना यांना निवेदनाद्वारे केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur