Today : 03:07:2020


चारगाव जवळील शिरना नदीच्या पात्रात आढळला वाघ

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
भद्रावती, अतुल कोल्हे :
तालुक्यातील वेकोलिच्या भद्रावती क्षेत्रातील चारगाव सब एरिया चेक पोस्ट जवळून वाहणाऱ्या शिरना नदीच्या पात्रात पट्टेदार वाघ दगडाच्या खापी मध्ये अडकल्या ने एकच खळबळ माजली आहे. वाघ असल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच हजारो संख्येने नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. वृत्त लिहीपर्यंत वाघाला काढण्याचे काम सुरू होते. शहरापासून ८ - ९ किलोमीटर पश्चिमेकडे असलेल्या जुना कुणाडा येथील स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या शिरना नदीच्या पात्रात पूर्ण वाढ झालेला पट्टेदार वाघ दगडाच्या खापी मध्ये मागील पाय अडकून पडलेल्या अवस्थेत त्याठिकाणी कार्यरत वेकोली कर्मचाऱ्यांना दिसला हा भाग चारगांव वेकोलिच्या क्षेत्राच्या चेक पोस्ट जवळील आहे.
     सदर कामगारांनी ही माहिती आपल्या उपशास्त्रीय अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर त्यांनी भद्रावती येथील वनक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर यांना माहिती दिली माहिती मिळताच आपल्या चमूला घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठले ही घटना दि. ६ नोव्हेंबर ला सकाळी सहा वाजताच्या सुमारास समोर आली हा वाघ त्या ठिकाणी कसा अडकला याविषयी तर्क वितर्क काढल्या जात आहे. वनपरिक्षेत्राधिकारी महेशकर यांनी या घटणेची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकारी तथा पोलिसांना दिली. वाघाला बघ्यांची गर्दी हजारोंच्या संखेने झाल्याने त्यांना सांभाळने पोलिसांना कठिन झाले होते. या वाघाला त्या ठिकानाहुन काढण्या साठी वेकोलिने आपले डोजर व क्रेन दिले नसुन या सह्याने वनविभागाचे अधिकारी या वाघाला पींजऱ्यामध्ये टाकन्याचा प्रायत्न करीत आहे. वुत्त लिहेपर्यंत वाघाला पिजऱ्यात अडकविन्यात आले नव्हते. याच वाघाने दोन दिवसा पूर्वी या भागातील चारगांव या गावातील एका बैलाल जखमी केले होते. या वाघाच्या परिसरातील अस्तित्वामुळे वेकोलि कांमगारांसह गवकारी दहशतीत आले आहे. वनविभागचे वरिष्ठ अधिकारी, माजरी पोलिस विभाग, ईको प्रो चे बंदु धोत्रे सह इको प्रो ची संमूर्ण टीम, वेकोलि अधिकारी तसेच कर्मचारी आणि सार्ट संघटनेचे पदाधिकारी या वाघाला काढण्या साठी परिश्रम घेत आहे.
News - Chandrapur | Posted : 2019-11-06


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध