Today : 03:07:2020


शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढणार ?

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. त्यांचे कामाचे तास वाढविण्याचा विचार सरकार करत आहे. एकीकडे सातवा वेतन आयोग लागू करताना वाढलेल्या वेतनात दुसरीकडे वेळही वाढविण्यात येणार आहे. सरकार लवकरच नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने वेतन सुधारणा नियमाचा मसुदाही तयार केला आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या तासामध्ये एका तासाची वाढ करण्याचे सुचविण्यात आले आहे. सध्या सरकारी कर्मचारी आठ तासांच्या कामाच्या नियमानुसार २६ दिवसांच्या कामानंतर वेतन घेतात. या मसुद्यामध्ये राष्ट्रीय कमाल वेतन मर्यादेची घोषणा सहभागी नाहीय. मसुद्यामध्ये सांगितले की, भविष्यात एक विशेषज्ञांची समिती कमाल वेतन मर्यादेवर सरकारला प्रस्ताव देईल. श्रम मंत्रालयाने सर्व पक्षकारांना या मसुद्यावर एका महिन्याच्या अवधीत सूचना देण्याचे सांगितले आहे. डिसेंबरमध्ये नियमांना अंतिम रुप दिले जाईल.
     मजुरी ठरविम्यासाठी देशाला तीन भौगोलिक भागांमध्ये विभागण्यात आले आहे. पहिला ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर, दुसरे १० ते ४० लाख लोकसंख्या आणि तिसरा ग्रामीण भाग करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाईम्सने हे वृत्त दिले आहे. जुलै २०१८ पर्यंत दिवसाचे उत्पन्न, मजुरी ३७५ रुपये निर्धारित करण्यात आले होते. तसेच ९७५० रुपये किमान मासिक वेतन असावे. सात सदस्यांच्या या समितीने हे सुचविले होते. तसेच शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना १४३० रुपये निवासी भत्ता देण्याचेही म्हटले होते.
News - Delhi | Posted : 2019-11-06


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे उडान फाउंडेशन, आदर्..