Today : 03:07:2020


त्वरित कापूस वेचणी करून सुरक्षित ठिकाणी हलवा

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
वि.प्र.चंद्रपूर, अमर बुद्धारपवार :
कापूस फुले व बोन्ड भरणे अवस्था कपाशी पिकामधील कपाशीचे फुटलेले बोन्ड असेल तर पावसाची उघडीस पाहून किंवा स्थानिक वातावरणाचा अंदाज घेवून त्वरील कापूस वेचणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निबोंळी अर्काची फवारणी करावी. तसेच आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच त्यांच्या नियंत्रणासाठी फिफ्रोनिल 5 टक्के एससी 35 मि.ली. किंवा बुप्रोफेझिन 25 टक्के इसी 20 मि.ली.प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.कपाशी पिकावर लाल्या रोग येवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बोण्डे परिपाक होण्याच्या अवस्थेत 1 टक्के युरिया अधिक 1 टक्के मॅग्रेशियम सल्फेट ची फवारणी करावी.1 टक्के युरिया 10 लिटर पाणी पांढरी माशीची ओळख व प्रादुर्भाव : पांढरी माशी आकाराने अगदी लहान असून पंख पांढुरके किंवा करडया रंगाचे  असतात पिल्ले पानाच्या मागच्या बाजूने एका ठिकाणी स्थीर राहून पानातील रस सोषक करतो. त्यामुळे पाने कोमेजतात. तीव्र स्वरुपाचा प्रादुर्भाव असल्यास पाने लालसर ठिसूळ होवून वाळतात, याशिवाय पिल्ले शरीरातील चिकट द्रव बाहेर टाकतात.त्यावर काळी बुरशी वाढते ,असे प्रादुर्भाव ग्रस्त झाड चिकट व काळसर होते.झाडाची वाढ खुटते व त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होते. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी बुप्रोफेझिन 25 टक्के इसी 20 मि.ली.किवा  प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.लाखोळी पेरणी उतेरा पध्दतीने – लवकर येणाऱ्या धान पिकात कापणीच्या 15 दिवसापुर्वी हेक्टर 70 किलो लाखोळी वाण माहातोरा रतन किंवा प्रतीक उतेरा पध्दतीने पेरणी करावी.पेरणीसोबत हेक्टरी  20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद दयावे.
     धान भात फुलोरा ते लोम्बी येण्याच्या अवस्था : स्थानिक वातावरणाचा पावसाच्या अंदाजानुसार धान पिकांची पकतेनुसार कापणी जमिनीलगत करावी.कापलेले पिक उन्हात  वाळवल्यानंतर पेंढया बांधून मळणीसाठी खळयावर रचून ठेवावे व मळणी करावी.मध्यम व उशिरा येणाऱ्या धान पिकामध्ये मानमोडी रेागाचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम 10 ग्रॅम किंवा कॉपर ओक्सिक्लोराइड 25 ग्रॅम किंवा ट्रायकोझेाल 7 ग्रॅम यापैकी कोणतेही एका बुरशीनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.धान पिकावर तपकिरी तुडतुडे याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तरी धान पिकात प्रति चुड 5 ते 10 पिकावर तपकिरी  तुडतुडे दिसताच त्यांच्या नियंत्रणासाठी मेटारहयझिम अनीसोपली ही जैविक 2.50 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात दयावीत तुडतुडयाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच नियंत्रणासाठी इमिडेक्लोप्रीड 17.8 एस.एल.2.2 मि.ली.किवा फिप्रेानील 5 एस.सी. 10 मि.ली. किंवा ट्रायझेाफॉस 40 टक्के प्रवाही 12.5 मी.ली.10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
     तुर वाढीची अवस्था : तुर पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीपासून सौरक्षणासाठी किमान एकरी दोन फेरोमन सापळे लावावे सापळयातील अडकलेल्या पतंग नष्ट करावे व आवश्यकतेनुसार 20 ते 25 दिवसांनी एकदा त्यांतील वडी लूर बदलावी.नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोंळी अर्काची फवारणी करावी किंवा किनॉलफॉस 25 टक्के इसी 16 मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झेाएट 5 टक्के एसजी ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबिन काढणी अवस्था : वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबिन पिकाची पक्कतेनुसार काढणी कापणी पावसाची उघडीप पाहून करावी. व मळणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.वरील प्रमाणे पिका संदर्भात उपाययोजना करण्याचे कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही व जिल्हा कृषी अधिकारी चंद्रपूर यानी कळविले आहे.
News - Chandrapur | Posted : 2019-11-06


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliअहेरीत पत्रकार दिन साजरा (उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप)

2018-01-08 | News | Gadchiroli