Today : 04:07:2020


भाजपा सरकारचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष - माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर

"काजळसर येथील काॅग्रेस कार्यकर्ता मेळावा"
चिमूर, प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील विविध समस्या सोडविण्याचे काम काँग्रेसच्या राजवटीत करण्यात येत होते. ग्रामीण भागात विविध कल्याणकारी योजना अंमलात आणून सुदृढ परिस्थिती निर्माण केली परंतु विध्यमान भाजप सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून कल्याणकारी योजना बंद करण्याचे काम करीत आहे. ऑनलाईन च्या नावाखाली जनतेची पिळवणूक होत असून जनता लाईनमध्ये तासनतास उभी आहे. अशातच अंगणवाडी कर्मचारी आशा वर्करचे  मानधन होत नाही दिवाळी अंधारात जाते शाळेतील विद्यार्थ्यांचे पोषण आहार बंद होणे हे कशाचे लक्षण आहे असे आरोप करीत माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर यानी कार्यकर्त्याना सांगितले की गोरगरीब, सामान्य जनतेच्या हितासाठी काँग्रेस कटिबद्ध असून चिमूर विधानसभा क्षेत्रात आमदार की च्या काळात विविध विकासाची कामे केली आणि राजकारण सोबत समाजकारण सुद्धा सुरु असून चिमूर विधानसभा क्षेत्रात जि.प. चे माजी अध्यक्ष तथा गट नेते डॉ. सतीश वारजूकर हे प्रत्येक गावात जाऊन समस्या जाणून घेत असून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकारी यांनी एक निष्ठेने गटबाजी न करता काँग्रेस सोबत राहून पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले.
     शिरपूर पंचायत समिती क्षेत्र मधील स्नेहमिलन कार्यकर्ता मेळावा काजळसर येथील कार्यक्रमात माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर बोलत होते यावेळी जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, जि.प. गट नेते डॉ. सतीश वारजूकर, माजी तालुका अध्यक्ष प्रा.राम राऊत, संजय डोंगरे, राजेश कांबळे, खेमराज मरस्कोल्हे, विजय गावंडे, प.स. गट नेते रोशन ढोक, चिमूर विधान सभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अविनाश अगडे, प्रशांत डवले, विजय डाबरे, अजय जगीडवार, मासुरकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यमान सरकारवर टीका करीत काँग्रेस जनहित धोरण कसे होते यावर मार्गदर्शन केले.
     दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १९९९ साली स्थापन झाल्यापासून संस्थापक सदस्य व कोणत्याही पक्षात न जाता एकनिष्ठेने कार्य करणाऱ्या रा.काँग्रेस महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष उषा गावंडे यांनी आपल्या कार्यकत्यासह जि.प.गट नेते डॉ.सतीश वारजूकर यांच्या कार्य पद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असल्याने काँग्रेस महिला आणखी मजबूत झाली.
     या स्नेह मीलन कार्यकर्ता मेळाव्यास शिरपूर पंचायत समिती मधील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli