Today : 21:09:2019


ग्रामीण भागातील स्वप्निल घेतो उरोनेटिक मॉडेलिंग क्लास शासकिय नौकरीकडे न वळता करतो स्वतःचा व्यवसाय

विदर्भ टाइम्स न्यूज
फिरोज़ पठाण, चिमूर :- आजकाल युवा वर्ग हा आई वडीलांच्या भरवश्यावर  शिक्षण घेत असतो शिक्षण घेत राहून शासकीय नौकरी कडे बघत असतो किंवा व्यवसाय क्षेत्रातील युवा हे वडीलांच्या व्यवसायावर बसून व्यवसाय करीत असतो. परंतु अवघ्या १८ व्या वर्षी वर्ग १२ वी विज्ञान शिक्षण घेत असताना मॉडेलिंगचे क्लास घेऊन शिक्षण व स्वतःचा उदरनिर्वाह करून व्यवसायासोबत १२ तरुणांना काम देऊन मोठा व्यावसायिक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वप्निल नागपूर मधून विदर्भात जाळे पसरवीत असून प्रसार करीत आहे.
     चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामधील शिवण पायली या छोटया गावातील स्वप्निल भास्कर रामटेके याने वर्ग १ ते ४ पर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेऊन त्याने पुढील शिक्षण नागपूर येथे घेतले असून वर्ग १२ वी विज्ञानची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. दरम्यान बालवयात त्याला कोणतेही घरी वातावरण नसताना उरोनेटिक मध्ये रुची होती टाकाऊ वस्तू पासून नवीन वस्तू तयार करणे, इलेक्ट्रिक वस्तू नव्या पद्धतीने तयार करणे इत्यादी  विषयाची आवड होती.
     घरात कोणीही उच्च शिक्षित नसताना स्वतःच्या बुद्धीच्या बळावर त्याने प्राथमिक शिक्षण शिवण पायली येथे घेऊन नागपूर ला वर्ग ५ वी पासून शिक्षण घेऊ लागला यूरोनेटिक कडे आवड वाढू लागली विमान सारखे किंवा पक्षी जसे आकाशात उडून पुन्हा आपल्याच ठिकाणी येतात त्याप्रमाणे एखादी वस्तू आकाशात उडवून त्या पुन्हा परत येईल असे उरोनेटिक मॉडेलिंग स्वतःच नागपुरात करु लागला.
     हायजॅक सध्याची वेळ आहे तंत्रज्ञान नविन - नविन येत आहे  सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष यांना कमी वेळात कसा जास्त प्रचार होईल आकर्षण कसे करता येईल यासाठी नवीन - नवीन उपाय शोधत असतात. आकाशात चिन्ह उडवून ५ किमी. परिसरात लोकांना दिसून त्यांना कुतूहल निर्माण होऊन आकर्षण तयार होईल राजकीय चिन्ह घड्याळ, कमळ, पंजा, धनुष्यबाण सारखे चिन्ह उरोनेटिक तयार केले आहे. 
     स्वप्निल वर्ग १२ वी उत्तीर्ण झाला असताना सुद्धा कलेचे वेड सोडले नाही उरोनेटिक मॉडेलिंग मध्ये १२ युवकांची चमू असून मागणी आलेल्या ठिकाणी जाऊन प्रसार - प्रचार त्यांचे करीत असून या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वप्निलने इतरांना सुद्धा रोजगार देण्यात यश मिळविले आहे. उरोनेटिक मॉडेलिंग मध्ये कृषी, निवडणूक, सर्व्हे आदी विषयावर माहिती देऊ शकतो.
     स्वप्निल ने उरोनेटिकचे वर्ग घेऊन दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतो  विमान कसे उडवले जाते ? विमान संबधी संपूर्ण माहिती शिकविल्या जाते ड्रोन च्या माध्यमातून वन, कृषी, क्षेत्राची माहिती दिल्या जाते उदा जगलात  वाघ आहे तो कोठे आहे कसे पकडले जाईल  कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना पिक व त्यावरील रोग कोणता होणार अशी माहिती सुद्धा दिली जाते.
     चिमूर तालुक्यातील शिवनपायली या ग्रामीण भागातील असून स्वप्निल ची आई नर्मदा रामटेके हि भाजप ची कार्यकर्ती असून पंचायत समिती सदस्य आहे तर वडील किराणा दुकान व्यवसायीक आहे. 
स्वतःच्या कर्तृत्व, हुशारी, चाणाक्ष बुद्धी जोरावर स्वप्निल ने भरारी घेऊन मोठा उरोनेटिक मॉडेलिंग व्यवसायी बनण्याचे स्वप्न बाळगुणी स्वप्निल काम करीत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

दोन वर्षात या ठिकानचा चेहरा - मोहरा बदललेला दिसेल : आ.अॅड.धोटेंची ग्वाही (अमलन

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
गडचांदुर, सैय्यद मुम्ताज अली :-
महाराष्ट्र शासन पर्यटन व वन विभागाकडून निसर्गरम्य पर्यटन क्षेत्राच्या विका..