Today : 17:02:2020


आलापल्लीचे चाणक्य मतीमंद विद्यालय नियमबाह्यरित्या आष्टीत स्थानांतरीत शिक्षण हक्क कायद्याची केली पायमल्ली शासनाला ठेवले अंधारात

विदर्भ टाइम्स न्यूज  
प्रकाश दुर्गे, अहेरी :-  प्रभु विश्वकर्मा ग्रामीण बहूउदेशिय शिक्षण संस्था वर्धा व्दारा संचालित चाणक्य निवासी मतीमंद विद्यालय आलापल्ली हे शासनाची कोणतीही परवानगी न घेता चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरीत करुन संस्थेने एक प्रकारे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
     सर्वांना शिक्षण मिळायला पाहिजे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून शासन समावेशीत शिक्षणावर लाखो, करोडो रुपये खर्च करुन खाजगी शिक्षण संस्था मार्फत असे विद्यालय चालवित आहे. खाजगी शिक्षण संस्थांना अशी शाळा चालविण्यासाठी मान्यता देताना स्वतंत्र्य व सर्व सोयीनी सुसज्ज अशी शाळा ईमारत व इतर अटी शर्ती घालुन मान्यता प्रदान करीत असते.
     पण याला आलापल्लीचे चाणक्य मतीमंद विद्यालय अपवाद ठरले आहे. सविस्तर वृत असे आहे कि, वर्धा येथील प्रभूविश्वकर्मा या शिक्षण संस्थेला २००६  मध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे मतिमंद विद्यालय सुरु करण्यासाठी शासनांनी मंजुरी दिली होती. काही वर्ष ही शाळा आलापल्लीत भाड्याचे इमारतीत सुरु होती. त्यानंतर मागील दिड वर्षापुर्वी  हीच शाळा लगतच्या नागेपल्ली येथे नेण्यात आली. आता हेच विद्यालय मागील दोन दिवसापूर्वी शासनाची स्थानांतरनाबाबत कोणतीही परवानगी न घेता आपल्याच मनमर्जी प्रमाणे आलापल्ली पासून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे  स्थानांतरीत करण्यात आलेले आहे, असे करतांना त्यांनी पालकांना विश्वासात घेतले नाही. आलापल्ली पासून दोनशे किलोमीटर अंतरावरील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत होती. आलापल्ली हे सर्वासाठी मध्यवर्ती ठिकाण होते. आठवडी बाजाराला आलेला पालक आपल्या पाल्यांना भेटत होते. पण आता आष्टीला लांब अंतरावर शाळा नेल्याने पालकांची मोठी पंचाईत झाली आहे. गरीब पालकांना पैसे खर्च करून लांब अंतरावर जायला परवडत नाही.
     या शाळेत अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी येथील पाचही तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लांब अंतरावर शाळा स्थानांतरण केल्याने आता या उपविभागातील समावेशीत शिक्षणातील मुले वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. 
     प्रस्तृत प्रतिनिधी ने दिनांक १८ नोव्हेंबर ला प्रत्यक्ष शाळेत जावून शाळा प्रमुखाशी चर्चा केली असता शाळा स्थानांतरन करणे हा विषय संस्थेचा आहे. पण आलापल्ली परिसरात योग्य इमारत उपलब्ध होत नसल्याने शाळा आष्टीला नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाणी  शाळा आलापल्लीत चालविण्यासाठी मान्यता दिली असताना संस्था चालक शासनाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अर्ध शैक्षणिक सत्र संपल्यावर शाळा लांब अंतरावर नेत आहे. 
     त्यामुळे विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील दहा वर्षापासून ही शाळा आलापल्लीत सुरु असतांना संस्था चालकांनी एक इमारत का बांधली नाही ?  व आता आपल्या सोयीसाठी शासनाची कोणतीही परवानगी न घेता संस्थाचालक आपल्या मनमर्जीप्रमाणे शाळा एका ठिकाणाहून लांब अंतरावर स्थानांतरीत करुन शासन प्रशासनाला आव्हान देत आहे अशा मुजोर संस्था चालकावर नियमानुसार कारवाई करुन शाळा पुर्वरत आलापल्ली परिसरात सुरु करण्यासाठी बाध्य करावे अशी मागणी गरीब पालक वर्गातून करण्यात येत आहे.
 
कोट - १ "शासनाची पुर्व परवानगी असल्याशिवाय कोणतीही शाळा स्थलांतरीत करता येवू शकत नाही. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेशी बोलुन माहिती घेउन योग्य कारवाई केली जाईल."  नितीन ढगे, समाज कल्याण आयुक्त, पूणे.

कोट - २ "शाळा स्थलांतराबाबत जिल्हा कार्यालयाला कोणतीही माहिती नाही. संस्थेनी याबाबतचा कोणताही प्रस्ताव सादर केला नाही. प्रस्ताव आल्यास योग्य कारवाई केली जाईल. शासनाच्या पुर्व परवानगी शिवाय कोणतीही शाळा स्थलांतरीत केल्या जावू शकत नाही. नियमानुसार कारवाई केली जाईल" सुरेश पेंदाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गडचिरोली.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
गिरगाव पांदन रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बु