Today : 06:07:2020


अहेरीच्या साधन व्यक्तीनी तेरा शाळाबाह्य मुलांना केले शाळेत दाखल

विदर्भ टाइम्स न्यूज  
प्रकाश दुर्गे, अहेरी :-  शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील कोणतीही बालके शाळाबाह्य राहू नये. सर्वांना शिक्षण मिळायला हवे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करुन घेतल्या जाते. शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करायलाच हवे कुणीही शाळेपासून वंचित राहू नये यासाठी मा उच्च न्यायालय आग्रही आहे. या न्यायालयाने दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारला फटकारत येत्या ३१ मार्च पर्यंत स्वतंत्र आय ए एस दर्जाच्या अधिकार्याची नेमनूक करुन शाळाबाह्य मुलांसाठी स्वतंत्र कार्यक्रम राबविण्याबाबत आदेश दिला आहे.
     मागील तीन वर्षांपासून अहेरी गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करीत आहेत. मागील वर्षी सुध्दा त्यांनी अकरा शाळा बाह्य मुलांना शाळेत दाखल केले ती आज शाळा शिकत आहेत.
     यवतमाळ व गोंदिया जिल्हातील काही स्थलांतरीत  कुटूंबे नागेपल्ली येथे झोपडी बांधून वास्तव्याला आठ दिवसापूर्वी आली होती. त्यांचे शाळाबाह्य मुले नागेपल्ली परीसरात फिरतांना विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे यांना आढळुन आलीत. त्यांनी आपले सहकारी विषय साधन व्यक्ती अरुण जकोजवार, ज्ञानेश्वर कापगते, प्रविणा कांबळे व दिपा रामटेके यांचे सहकार्याने त्यांनी काल दि.२० नोव्हेंबर ला प्रत्यक्ष ही मुले राहत असलेल्या झोपड्यावर जात शाळा बाह्य मुलांचा शोध घेतला व त्यांचे पालकांशी चर्चा करुन शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत त्याना शाळेत दाखल करण्याची विनंती केली.
     पालकांनी होकार दिल्यानंतर इयत्ता पहिलीचे १ विद्यार्थी,  दुसरीत चे २ विद्यार्थी, तीसरी चे २ विद्यार्थी, चौथी चे ३ विद्यार्थी, पाचवी चे ३ विद्यार्थी व सहावी चे २ विद्यार्थी, असे एकून तेरा विद्यार्थी जवळच्या धर्मराव हाॅस्कूल नागेपल्ली व जिल्हा परिषद शाळेत गट शिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांचे मार्गदर्शनाखाली दाखल केलीत. 
     साधन व्यक्तीनी स्वतः पैसे खर्च करीत पुस्तके, वह्या , पेन, पेन्सील विद्यार्थीना उपलब्ध करुन दिले व स्वतःच्या गाडीवर बसवून शाळेपर्यंत पोहचवून दिले. शाळेत जाण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या सर्व मुलांचे स्वागत पुष्पगुच्छाने धर्मराव हाॅस्कूल नागेपल्लीचे मुख्याध्यापक सुब्बाराव यांनी केले व शाळेकडुन वह्या  व पेनी दिल्यात. यावेळी पी एस एम, आर एम एस ए तालुका समन्वयक प्रकाश दुर्गे, पर्यवेक्षक पिंपळकर, निरंजन निमसरकर, सुरेश दासरवार व अन्य शिक्षक तथा पालक उपस्थितीत होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli