Today : 21:02:2020


लखनऊ मध्ये देशी बॉम्बनं वकिलांवर हल्ला

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
लखनऊ :
लखनऊ येथील सीजेएनम कोर्टाच्या परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी वझीरगंज सत्र न्यायालय येथे झालेल्या एका बॉम्बस्फोटात दोन वकील जखमी झाल्याचं कळत आहे. संजीव लोधी असं एका जखमी वकिलांचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच या परिसरात एकच गोंधळ माजला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच त्या ठिकाणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यान तीन देशी बॉम्ब हाती लागले. सध्याच्या घडीला यासंबंधीचं सविस्तर वृत्त प्रतिक्षेत आहे. असं असलं तरीही वकिलांमध्ये असणाऱ्या परस्पर वैमनस्यातून हा घातपात घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारीच्या मुद्द्यावरुन वकिलांच्या दोन गटांमध्ये असणाऱ्या मतभेदांमुळे टोकाचा निर्णय म्हणून हे पाऊल उचललं गेल्याचं कळत आहे. कोर्टात उपस्थित असणाऱ्या वकिलांवर निशाणा म्हणूनच हा स्फोट घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार जीतू यादव असं स्फोट घडवून आणणाऱ्या एका व्यक्तीचं नाव आहे. देशी साहित्याचा वापर करतच हा बॉम्ब बनवण्यात आल्याचं सध्या स्पष्ट होत आहे.
News - Delhi | Posted : 2020-02-13


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur