Today : 21:09:2020


बहुजन कल्याण विभाग नाव दुरुस्तीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध

विदर्भ टाईम्स न्युज : गोंदिया
गोंदिया :
राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीत ओबीसी विभाग इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग नाव बदलून बहुजन कल्याण विभाग करण्यात आले आहे. सदर विभागाच्या नाव बदलास राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध दर्शविला असून मागील सरकारने दिलेले ओबीसी मंत्रालय हेच नाव कायम ठेवावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव व प्रसिद्धीप्रमुख खेमेन्द्र कटरे यांनी केली आहे. सरकारने एका आठवड्याच्या आत बहुजन कल्याण विभाग हे ठेवलेले नाव बदलून ओबीसी विभाग (मंत्रालय) न केल्यास आंदोलनात्मक पावित्रा घेण्याचा इशाराही यावेळी दिला आहे. राज्यात या विभागा अंतर्गत येत असलेले विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग हे केंद्रात ओबीसी प्रवर्गातच येत असल्याने ओबीसी मंत्रालय हेच नाव योग्य आहे. 
     ८ डिसेंबर २०१६ रोजी राष्ट्रीय ओबीसी महा संघाने काढलेल्या महामोर्चामुळे तत्कालीन राज्य सरकारला ओबीसी मंत्रालयाची घोषणा करावी लागली. त्यानंतर तत्कालीन सरकारने या मंत्रालयाचे विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग विभाग असे नाव ठेवले होते. त्यावरही राष्ट्रीय ओबीसी महा संघाने आक्षेप घेत मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसींचे नाव आधी घेण्याची मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने इतर मागास वर्ग हे नाव दिले. त्यात विद्यमान सरकारने ओबीसींची स्वतंत्र ओळख पुसून ओबीसी च्या अस्मितेवर घाला घातला आहे. सरकारने आजच्या मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय त्वरित रद्द करून ओबीसी मंत्रालय (विभाग) हेच नाव कायम ठेवावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सह सचिव व प्रसिद्धी प्रमुख खेमेन्द्र कटरे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
News - Gondia | Posted : 2020-02-14


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..नवंतळा येथे विश्वकर्मा जयंती साजरी

2018-02-04 | News | Chandrapur