Today : 21:09:2020


गोंडीयन समाजानी शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे : ति.लिंगोराव सोयाम

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
जिवती, दिपक साबने
: आदिवासी बहुल असलेल्या जिवती तालुक्यातील महा पांढरवाणी येथे गोंडवाना प्रबोधन मेळावा नुकताच संपन्न झाला. गोंडवाना प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन कर्णु पाटील धुर्वे, गाव पाटील महा पांढरवाणी यांचे शुभ हस्ते करण्यात आले. तर लिंगोराव सोयाम, मुख्याध्यापक जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा येरमी येसापूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. न्याय हक्काकरिता आदिवासी समाजाने संघटित व्हावे, आदिवासी म्हणून आपली संस्कृति, रूढ़ि परम्परा जोपासने, आदिवासी समाजात एकता निर्माण करने यासोबतच गोंडियन  समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्याची आजची गरज आहे.  तरच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन लिंगोराव सोयाम यांनी केले. जगेरावजी कोटनाके, इस्रू आडे, जगी राव मेश्राम, मारोती आडे, तुकाराम धुर्वे, जंगु कोटनाके, अनिता धुर्वे, रूपा कोटनाके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 
     सर्वप्रथम गावातून रॅली काढण्यात आली आणि सकाळी ९ वाजता सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण आदरणीय पाटील धुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यामध्ये इयत्ता बारावी मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल जगेराव मारोती आडे तर दहावी मध्ये सर्वाधिक मार्क घेतल्याबद्दल रंभा जंगु कातले यांचे शील्ड आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख अतिथी जंगु कोटनाके यांनी खरा मुक्त गाव करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्त्न करावे असे आवाहन केले. तसेस तुकाराम दुर्वे यांनी गावाचा विकास करण्यासाठी स्वच्छ गाव सुंदर गाव हे संकल्प करावे असे सुचविले. गावातील महिला आणि तरुणींनी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिमराव मेश्राम, लिंगु आडे, माणिकराव पेंदोर, लिंग धुर्वे, संभा पेंदोर प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ता भोजु सिडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता मोहन आत्राम यांनी मानले.
News - Chandrapur | Posted : 2020-02-14


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


जुन्या बसस्थानकाला तोडणाऱ्यावर कारवाईसाठी साखळी उपो