Today : 21:02:2020


भामरागडचे नांव असेच लौकिक करा : आ.धर्मराव बाबा आत्राम

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली 
भामरागड :
जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत अतिदुर्गम समजले जाणारे भामरागड तालुका चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरल्याने भामरागडचे नांव असेच लौकिक करा असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. १२ फेब्रुवारी रोजी येथील समूह निवासी शाळेत शिक्षक व सहभागी खेळाडूंचे गौरव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मदगुम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, सभापती गोयी कोडापे, जि.प.सदस्य ग्यानकुमारी कौशिक, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावणे, पोलीस निरीक्षक संदीप भांड, श्रीकांत मोडक आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, तालुकास्तरावरील क्रीडा स्पर्धेचे उदघाटन करण्यासाठी भामरागडला आलो असता जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धेत भामरागड तालुका अव्वल ठरावे अशी आशा व अपेक्षा व्यक्त केले. त्या दिशेने खेळाचे सराव व वाटचाल करून आलापल्ली येथे आयोजित जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धेत प्राथमिक गटातून भामरागड येथील शालेय विद्यार्थी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकून आणल्याने मला मनस्वी अत्यानंद होत असून भामरागड तालुक्याचा नांव असेच उज्जवल करीत राहा असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन केले. 
     प्रास्ताविकातून यावेळी गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावणे यांनी विद्यार्थी व खास करून शिक्षक वृंद अथक परिश्रम घेतल्याने आणि दस्तुरखुद्द आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी क्रीडा व कलेत  चमकले पाहिजे असे लक्ष्य दिल्याने घवघवीत यश संपादन करण्यात आल्याचे आवर्जून सांगितले. त्या नंतर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी क्रीडा स्पर्धेत व सराव करण्यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम घेतल्याने त्यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले व शालेय बालकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार  विनोद पुसलवार यांनी केले. यावेळी शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2020-02-14


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli