Today : 21:02:2020


सामान्य जनतेशी संवाद साधल्याशिवाय समस्या सुटणार नाही : आ.धर्मराव बाबा आत्राम

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली 
मुलचेरा :
सर्वसामान्य लोकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जनतेनी आपल्याला निवडून दिला आहे. जनतेची विविध समस्या सोडविण्यासाठी आपण तत्पर असून सामान्य जनतेशी संवाद साधल्याशिवाय समस्या सुटणार नसल्याचे प्रतिपादन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. मुलचेरा तालुका मुख्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युधिष्टिर बिश्वास, नगरपंचायतचे अध्यक्ष दीपक परचाके, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, नगरपंचायत चे उपाध्यक्ष वनिता आलाम, पंचायत समितीचे सभापती सुवर्णा येमुलवार, उपसभापती प्रगती बंडावार, प.स. सदस्य सतीश विधाते, विवेकानंदपूरचे सरपंच ममता बिश्वास, नगरपंचायतचे बांधकाम सभापती कविता सिडाम, आरोग्य व स्वच्छता सभापती नीता मेश्राम, उप सरपंच निखिल इज्जतदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच हरिपद पांडे, शहर अध्यक्ष मनोज कर्मकार, कार्याध्यक्ष मनोज बंडावार, माजी पंचायत समिती सभापती विठ्ठल निखुले, नगरसेवक सुभाष आत्राम, देवा चौधरी, उमेश पेळूकर, जेष्ठ कार्यकर्ते गणपत मडावी, मारोती वेलदी, वसंत आलम, मारोती नैकलवार, मनोहर शेट्टीवार, ईश्वर मडावी, मधुकर वेलादी, शैलेंद्र खराती, रंजित स्वर्णकार, दिवाकर उराडे, मारोती पल्लो आदी मान्यवर उपस्थित होते. 
     पुढे बोलताना सर्वसामान्य जनतेला प्रत्येक वेळी विविध कार्यालयात जाऊन आपले काम करून घेणे शक्य नाही त्यामुळे तालुका मुख्यालयात आमसभा आणि जनता दरबार या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्याचा हा प्रयत्न असून दर दोन महिन्यानंतर विविध गावात भेटी देऊन सर्वांचे विविध प्रश्‍न सोडविण्याचे काम करणार आहो. जनतेने जो विश्वास दाखवून आपल्याला निवडून दिले आहे त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही असेही यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलून दाखवले. भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील विविध गावातील लोकांनी उपस्थिती दर्शविली आणि विविध समस्यांचे निवेदन देऊन त्या सोडविण्यासाठी मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त विज बिल, जमिनीचे पट्टे, धान खरेदी केंद्र, सिंचन समस्या, बस स्थानक समस्या, धान साठवून ठेवण्यासाठी गोदाम, रस्ते, पूल आदी समस्यांचे निवेदन देण्यात आले. 


अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची घेतले आढावा बैठक

विविध समस्यांचे निवेदन घेतल्यानंतर तहसील कार्यालय येथे विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकांचे विविध समस्या मांडून त्या त्वरित सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2020-02-14


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर