Today : 21:09:2020


दिवसाढवळय़ा वकिलांवर बॉम्ब फेकला हायकोर्टाच्या बाररूममध्ये स्फोट

विदर्भ टाईम्स न्युज ; वृत्त संस्था 
मुंबई
: गावठी बॉम्बच्या स्फोटाने उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ गुरुवारी सकाळी हादरली. आश्चर्य म्हणजे हा स्फोट येथील वजीरगंज कोर्टातील बाररूममध्ये झाला असून यात तीन वकील जखमी झाले आहेत. स्फोटानंतर पोलिसांना याच परिसरात आणखी दोन जिवंत बॉम्बही आढळून आले. एकाच बॉम्बच्या स्फोटाने कोर्टाच्या आवारात हाहाकार माजला. तेथील लोक वाट फुटेल तेथे पळायला लागले. हा गावठी बॉम्ब आपल्याला लक्ष्य करून फेकण्यात आल्याचे लखनौ बार असोसिएशनचे पदाधिकारी ऍड. संजीव लोधी यांनी सांगितले. स्फोटात लोधी हेसुद्धा जखमी झाले आहेत. दहा जणांच्या एका गटाने लोधी यांच्या चेंबरमध्ये घुसून गावठी बॉम्ब फेकला. बॉम्ब फेकणाराही वकीलच आरोपींनी तीन बॉम्ब फेकले. त्यातल्या एकाच बॉम्बचा स्फोट झाला. अन्य दोन बॉम्ब फुटले नाहीत, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. नंतर बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वॉडने दोन जिवंत बॉम्ब शोधून काढून ते निकामी केले. लोधी यांनी या बॉम्बफेकीचा आरोप जीतू यादव या आणखी एका वकिलावर केला आहे. 
News - Mumbai | Posted : 2020-02-14


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


बोगस जात दाखला सादर करणारे ११७०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

2018-02-05 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्यूज़ / चंद्रपुर 
ब्रम्हपुरी, गुलाब ठाकरे :-
सरकारी सेवेत असणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांनी नोकरीसाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर क..