Today : 21:02:2020


पुलवामा हल्ल्याला वर्ष उलटले; मात्र शहिदाच्या कुटुंबीयांना नोकरी नाही

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
नवी दिल्ली
: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद रोहिताश लांबा यांचे छोटे भाऊ जितेंद्र लांबा यांनी आरोप केला आहे की, त्यांना एका मंत्र्याकडून दुसऱ्या मंत्र्याकडे अशा चक्करा माराव्या लागत आहेत. माझा भाऊ शहीद झाल्यानंतर मला नोकरी देण्याचे आश्वासन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटून देखील मला नोकरी मिळालेली नाही अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली. 27 वर्षाच्या शहीद रोहिताश लांबा यांच्या धाडसाची चर्चा आजही गावात सर्वजण करतात. जयपूरच्या शाहपुरा येथील रोहितांश हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले होते. मात्र सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना दिलेली सर्व आश्वासनं अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही असे वृत्त आजतक या हिंदीवृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. शहीद रोहितांश यांचे वडील बाबूलाल लांबा म्हणाले की पुलवामा प्रकरणातील दोषी कोण हे अद्याप आपल्याला कळालेले नाही. त्यांना शिक्षा झाली आहे का ते देखील कळालेले नाही. बाबूलाल लांबा यांना आतापर्यंत दीड कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. 
    मात्र दहशतवादी हल्ल्याच्या तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला शहीद रोहितांश यांचे भाऊ जितेंद्र लांबा यांनी आश्वासन देऊन देखील सरकारकडून आपल्याला अद्याप नोकरी मिळालेली नाही, असे स्पष्ट केले आहे. एका मंत्र्याकडून दुसऱ्या मंत्र्याकडे मला फिरावे लागले. मात्र नोकरी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीवेळी मला दोन वेळा बोलवण्यात आले, खासदारकीसाठी तिकीट देऊ असे म्हणाले. पण मला तिकीट नको नोकरी द्या असे आपण त्यांना स्पष्ट सांगितल्याचे जितेंद्र यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यात रोहितांश शहीद झाले तेव्हा त्यांचा मुलगा अवघ्या दोन महिन्यांचा होता. मोठं दु:ख रोहितांश यांच्या पत्नीने सहन केलं. मात्र आपला मुलगा मोठा होऊन लष्करातच भरती व्हावा अशी त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
News - Delhi | Posted : 2020-02-14


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्