Today : 22:11:2019


सावली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रथमच उत्कृष्ट काम करणाऱ्या मापाऱ्याचा मुख्य प्रशासक अविनाश पाल यांच्या हस्ते सत्कार

प्रवीण गायकवाड, सावली :- कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार व्याहाड खुर्द येथील कार्यालयात दि. २१ नोव्हेंबर २०१७ रोज बाजार समितीचे मुख्य प्रशासक अविनाश पाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मागील सन २०१६-१७ व चालू आर्थिक वर्षाचा गोषवारा पाहण्यात आला व त्यावरून उत्कृष्ट काम करणारे व्यापारी गणेश मगरे, धनवान चलाख, दिलिप चुधरी, विलास मुघांटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, या मध्ये पुन्हा प्रामाणिकपणे काम करण्याची जिम्मेदारी आपली असून नव्या उमेदीने काम करावे व शेतकऱ्यांचा हिताचा विचार करुन  बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे. 
     यामध्ये जे व्यापारी उत्कृष्ट काम करून उत्पन्न वाढविणार अशा व्यापाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन पारितोषीक जाहीर करुन स्वागत करण्याचे मुख्य प्रशासक मा. अविनाश पाल यावेळी बोलतानां सांगीतले तसेच व्याहाड व सावली येथील मार्केट यार्ड सुरु करण्याविषयी चर्चा करण्यात आली. काही अडअडचणी आल्यास संपर्क साधावे त्या पुरेपुर सोडविण्याचे आश्वासन दिले, परतुं कामात हयगय करणाऱ्यांची गय करण्यात येणार नाही असा इशाराही दिला. 
     या बैठकीला उपमुख्य प्रशासक  विनोदजी गड्डमवार, तर प्रशासक सूधाकर गोबाडे, अरूनजी पाल, अर्जूनजी भोयर, शरद सोनवाने, पुनम झाडे, गुरूदेव भूरसे, अशोक नागापुरे, रविंद्र साखरे, भुवन सहारे, पुष्पाताई शेरकी, सचिव नरेश सुरमवार व बहूसंख्य मापारी, कर्मचारी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli