Today : 21:09:2019


गडचांदुरातील फिल्टर प्लाॅटच्या कामाची गती वाढवा भाजप शहर अध्यक्ष उपलेंचवार यांची मागणी

विदर्भ टाइम्स न्यूज 
सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- गडचांदुरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या करीता येथील प्रभाग क्रं.१,शिक्षक काॅलनीत भव्य अशी पाण्याच्या टाकी उभारण्यात येत आहे. जानेवारी २०१२ पासून सुरू झालेल्या हे काम पाच वर्षानंतर ही पुर्ण झालेले दिसत नाही. अत्यंत संथ गतीने हे काम सुरू असुन याकडे लक्ष देऊन कामाची गती वाढविण्याची मागणी गडचांदुर भाजप शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना निवेदनाद्वारे केली असुन या विषयी माहिती घेऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन अहिर यांनी दिले आहे.
     जीवन प्राधिकरण मार्फत सुरू असलेल्या सदर कामाला २२ नोव्हेंबर २०१० साली प्रशासकिय मंजुरी प्रदान करण्यात आली. १० कोटी ३५  लाख  ४२ हजार इतकी वित्तीय आकृती बंधनानुसार १२ जानेवारी २०१२, साली नागपूर येथील कंत्राटदाराने काम सुरू केले. काम पुर्ण करण्याचा कालावधी दोन वर्ष इतका होता मात्र पाच वर्षे लोटून ही ६५ टक्केच काम झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 
     मंद गतीने सुरू असलेल्या कामामुळे आगामी उन्हाळ्यात गड़चांदुरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. उन्हाळ्या अगोदर सदर पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झाल्यास पाणी प्रश्न सुटेल अशी इच्छा उपलेंचवार यांनी व्यक्त केली असुन या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची विनंती अहिर यांना केली आहे. " काम पुर्ण न होण्याचे कारण सदर प्रतिनिधीने विचारले असता, ज.सु.केंद्र तथा टाकी करिता जागा उशिरा मिळाली व लोकवर्गणी कमी असल्यामुळे निधी वेळेवर प्राप्त झाली नसल्याची माहिती देत तीन, चार महिन्यात काम पुर्ण करून शहराला पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन संबंधित विभाग अधिकाऱ्याने दिले आहे."




News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोज