Today : 06:07:2020


एटापल्ली तालुक्यात १२ कोटींची कामे होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कामे मंजूर

दिपक सुनतकर, अहेरी :-  एटापल्ली तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत उडेरा-बुर्गी-कांदोळी १२ किमी व उडेरा-मिरकल ५ किमी अशा २ रस्तासाठी १२ कोटी रुपयांचा कामांचे काल गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते भूमि पूजन करून कामांना सुरवात करण्यात आली. या कामात खडीकरण, डांबरीकरण व इतर कामे होणार असून अनेक दुर्गम गावे ही बारमाही रस्ताने जुडणार आहे याचा अनेक गावांना फायदा होणार असल्याने या गावांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
     मागील विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मार्गावर पक्या रस्ताची मागणी येतील लोकांनीं पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे केली होती व गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेली लोकांची ही मागणी पूर्ण करून अम्ब्रिशराव आत्राम यांनी विधानसभा निवडणुकीत लोकांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
     या  भूमि पूजन कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष नवीन बाला, शहर अध्यक्ष विजय नल्लावार, प्रशांत आत्राम, जनार्दन नल्लावार, उशना मेडीवार, डोलू दुर्वा, राहुल मेश्राम, संदीप दंडिकवार, सचिन मोतकूरवार, राकेश तेलकुंटलवार, संतोष भटपल्लीवार, सचिन तोडेवार, प्रसाद दासरवार, सूरज मंडल, संपत पैडकुलवार सह एटापल्ली तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती




News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli