Today : 13:11:2019


शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा सहविचार सभेत मूल व सावली तालुका कार्यकारिणी गठीत

फिरोज पठाण, चिमूर :- शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा सहविचार सभा मूल येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाली. सहविचार सभेचे अध्यक्षस्थानी शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रविंद्र उरकुडे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय सचीव सुरेश डांगे, डाकेश्वर कामडी, जिल्हा कार्याध्यक्ष, निर्मला सोनवने, अध्यक्ष माहिला आघाडी, कैलास बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष, पि.वाय. देशमुख, विभागीय सदस्य, अमरदीप भूरले, लक्ष्मण खोब्रागडे आदी  उपस्थित होते. 
     सहविचार सभेत चंद्रपूर जिल्हा अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्याविषयी चर्चा करण्यात आली. आजीव सभासद नोंदणी संदर्भाने चर्चा करण्यात आली.
शिक्षकांंच्या जूनी पेन्शन,२३ अॉक्टोबरचा वरिष्ठ वेतन श्रेणीचा तुघलकी शासन निर्णय, अॉनलाईन कामे, अशैक्षणिक कामे, संगणक अर्हता वेतनवाढ वसुली आदी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. सहविचार सभेत मुल तालुका व सावली तालुका कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. मूल तालुका अध्यक्षपदी नंदकिशोर शेरकी यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव पद क्रिष्णा बावणे, कार्याध्यक्ष पदी छबन कन्नाके, संघटक विजय मडावी, कोषाध्यक्ष कुमदेव कुळमेथे यांची निवड करण्यात आली तर महिला अध्यक्षपदी सिंधू गोवर्धन यांची निवड करण्यात आली. सावली तालुका अध्यक्षपदी किसन गेडाम तर सचिव पदी विजय मिटपल्लीवार यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी विनोद धानोरकर, संघटकपदी नेताजी रामटेके तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून जगदिश चिकराम यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी हिरोज भोयर यांची निवड करण्यात आली. पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
     सहविचार सभेचे संचालन नंदकिशोर शेरकी यांनी केले. प्रास्ताविक हिरोज भोयर यांनी तर आभार विजय मिटपल्लीवार यांनी मानले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती माग