Today : 16:02:2020


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला राष्ट्रसंताचा उल्लेख आ. किर्तीकुमार भांगडीया मदनापूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समारोपीय कार्यक्रम

फिरोज पठाण, चिमूर :- राष्ट्रसंतांचे कार्य महान असून राष्ट्रसंतांनी सर्वधर्म समभाव ची कल्पना सांगून या परिसरात कार्य केले असून मदनापूर येथील एम आर इ जी एस कामासाठी २५ लक्ष रुपयांची निधी ही स्मशान भूमी बांधकामासाठी ग्राम समितीच्या प्रस्तावानंतर मिळेल या वर्षी पाऊस अनियमीत आल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हिवाळी अधिवेशनात मार्ग काढणार असल्याचे सांगत राज्यातील सर्वात मोठी ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली असून विरोधक निवळ खोट्या वावड्या उठवीत असून येत्या महिण्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईल दोन चार महिन्यात २३३  कोटी रुपयांची मोखाबर्डी सूक्ष्म सिंचन योजना मासळ जि.प.परिसरात लागू होणार आहे. 
     १ डिसेंबर पासून मदनापूरला बफर झोन गेट चालू होणार असल्याने पर्यटकांची वाढ होऊन रोजगार निर्मितीस वाढ होईल असल्याचे सांगत आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले कि, राष्ट्रसंतांचा विचारांचे प्रसार व प्रचार महान कार्याची दखल हि देशाचे पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसंताच्या स्वच्छ: भारत सुंदर भारत वर पंतप्रधान मोदी राबवित आहे  हि अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
     मदनापूर येथील राष्ट्संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर वसंत वारजूकर, गुरुदेव आजीवन प्रचारक राजू देवतळे, विनोद अढाल,  प्रवीण गणोरकर, रामदास जांभुळे, ह.भ.प. चरडे गुरुजी, सरपंच दोडकेबाई, प.स. सदस्य गिता कारमेगे, संजय कुंभारे, ह.भ.प. चौधरी महाराज, गजानन गुडधे उपस्थित होते.
     पुण्यतिथी महोसत्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वामन भरडे  देवराव रंदये, भरत जांभुळे, उद्धव चौधरी,  राकेश शेरकी, परशुराम  ननावरे, आदी गुरुदेव भक्तांनी परिश्रम घेतले महा प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli