Today : 21:09:2019


जुव्वी येथे द्विस्तरीय बाल क्रिड़ा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन

प्रतिनिधी, भामरागड :- जुव्वी येथे द्विस्तरीय बाल क्रिड़ा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आले. या बाल क्रिड़ा संमेलनात एकूण ३० जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांनी भाग घेतला होता. यात लाहेरी व गोंगवाडा या केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांचा समावेश होता. दरम्यान शालेय विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. हे बाल क्रिड़ा स्पर्धा व सांस्कृतिक समेलन पुढे तीन दिवस चालणार आहे. २३ नोव्हेंबरला समारोप होईल.
     या बाल क्रिड़ा स्पर्धा व सांस्कृतिक समेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून या क्षेत्राचे जिल्हा परिषद् सदस्य लालसू नोगोटी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक सभापती श्री. सुखराम मडावी तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद् सदस्य ग्यानकुमारी कौशी, उपसभापती प्रेमिला कुड्यामी, तहसीलदार अंडील, संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार, गट शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी सोनावाने इ. उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुन्यांनी शिक्षणावर जोर देत, शिक्षण हे आजच्या काळाची गरज आहे. शिक्षणाशिवाय आपण विकासाची कल्पनाच करू शकत नाही. असे विचार मांडले. या प्रसंगी अध्यक्षिय भाषण करतांना लालसू नोगोटी म्हणाले की, आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरानी संगीतल्या प्रमाणे आज शिकुन संगठीत होऊन संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाशिवाय संघर्ष करणे अवघड आहे. आपण शिकल्यामुळेच येथील आदिवासी व अन्य समुदायाचे प्रश्न राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडत आहोत. सुशिक्षित व्यक्ती शासनाकडून मिळालेल्या योजनांचा व्यवस्थित अंमलबजावणी करू शकतो. 
     योजनांचा अंमलबजावणी करतांना अशिक्षित व्यक्ती समोर अनेक समस्य निर्माण होतात आणि शिक्षाकानी आपले कर्त्यव्य प्रमानिकपणे पार पाडल्यास हे शक्य आहे. म्हणून सर्व शिक्षकांनी आप आपली जबाबदारी प्रामाणिकपने पार पाडावी व समाज निर्माण प्रक्रियेत आपला योगदान द्यावा. असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन श्री. जोशी सर यांनी केले.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli