Today : 20:09:2019


शेतकऱ्यांच्या मागण्या घेवुन श्रमिक एल्गारचा काेठारी वनपरिक्षेत्र कार्यालयावर माेर्चा

संदिप गव्हारे, चंद्रपूर :- आज दि २३ नोव्हेंबर २०१७ रोजी बल्लारशाह तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी, काेठारी यांचे कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अँड.पाराेमिता गाेस्वामी यांचे नेतृत्वात माेर्चा काढण्यात आला. माेर्चा सरकारी दवाखाना ते वनपरीक्षेत्र कार्यालय, कोठरी पर्यंत काढण्यात आला असून माेर्चा वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडकला संघटनेचे उपाध्यक्ष मा.विजय सिद्धावार यांनी वनविभागाला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धारेवर धरत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व वनविभाग रानटी डुक्करांचा बंदाेबस्त करण्यास असमर्थ असुन शेतकऱ्यांनीच बंदाेबस्त करणार हे ठनकावुन सांगीतले. तसेच वनविभाग गँसच्या नावावर सरपनासाठी लाकुड आनण्यासाठी मज्जाव करत असुन हा महीलांवर अन्याय आहे हे आपल्या भाषणातून संघटनेचे महासचिव घनशाम मेश्राम यांनी सांगितले तसेच शेतकरी भिवराबाई आत्राम, दयानंद मेश्राम, नारायन मेश्राम यांनीही आपली मते मांडली.  
     शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान रानटी डुकरांमुळे हाेत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मात्र अत्यल्प मिळत आहे. शेतकऱ्यांना एकरी विस हजार रुपये नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी हे भाषनातुन सांगितले. वनपरीक्षेत्र अधिकरी, कोठरी श्री बाबा गाेरख हाके साहेब यांनी निवेदन स्विकरले व निवेदनातील शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवुन पाठपुरावा करण्यात येईल अशी माेर्चे कऱ्यांना ग्वाही दिली. 
     निवेदनात प्रामुख्याने रानटी डुक्करांचा बंदाेबस्त करण्यात यावा. शेतकऱ्यांना झालेल्या शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतीला विनामुल्य साैर कुंपन देण्यात यावे. ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळावु लाकुड उपलब्ध करावे, बाेरगाव येथील बांबुकारागिरांना हिरवा बांबु उपलब्ध करावा या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या. माेर्चात लाठी, कन्हाळगाव, कवडजई, बाेरगाव, पारडी, पळसगाव, काेठारी येथील शेतकरी सहभागी झाले हाेते. 
     सभेचे संचालन संघटनेच्या महासचिव छाया सिडाम यांनी केले तर मार्चाचे यशस्वीतेसाठी नितेश बावने, लख्खन काेडापे, मयुरी गेडाम, साईनाथ काेडापे, शितल मेश्राम, अंकीता टेकाम, यांनी परीश्रम घेतले. माेर्चा राष्ट्रगीताने समाप्त करण्यात आला.
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

2018-01-08 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक किलोमिटर अंतरावरील धुमनखेडा गावात सोमवार सायंकाळ सात वाजताच्य..