Today : 17:02:2020


अन विलासचा तो अखेरचा प्रवास ठरला धावत्या बसमध्येच घेतला अंतीम श्वास - डॉ.सतीश वारजूकरांनी केली मदत

फिरोज पठाण, चिमूर :-  मृत्यू येणार हे निश्चित असले तरी कुणाचा कुठे कधी केव्हा मृत्यू येईल हे निश्चित नाही, याला विलास ही अपवाद ठरला नाही अन त्याला धावत्या बसमध्येच मृत्यूने कवटाळले आपल्या स्वगावी जाण्याकरिता चिमूर वरून कानपाकडे जाणाऱ्या बसमध्ये विलास पंचम बाम्बोडे वय ४० खांबाडा हा चढला त्याचा पोटात ट्युमर होते. गाडीचा प्रवासात त्याचा पोटात दुखायला लागले. गाडीचा धक्का त्याला सहन झाला नाही, गाडीचा आवाजाने कुणालाही ऐकूही गेले नसावे. पोटातच ट्युमर फुटल्याने त्याने बसमध्येच अखेरचा श्वास घेतला.
     तो निपचीत पडला असल्याचे बस कंडक्टरचा लक्षात येताच त्याने सरळ बस शंकरपूर स्वास्थ केंद्रामध्ये आणण्यात आली व प्रवाश्यांना खाली उतरवून तपासले असता त्याचा प्रवासातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. तो मूळचा खांबाळा (नेरी) गावातील असून तो कांनपा येथे सासऱ्याकडे १० वर्षापासून राहात होता. त्याला तीन लहान मुली व पत्नी असून त्याचा पालन पोषणाची जबाबदारी कशी पेलवेल या विवंचनेत असतांना त्याचा परिवाराला मदतीचा हात म्हणून शंकरपूर डोमा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य तथा गटनेता डॉ.सतीश वारजुकर यांनी तात्काळ पं.स.सदस्य रोशन ढोक, अमोद गौरकर यांचे मार्फत दोन हजार रुपयांची मदत करुन सामाजीक बांधीलकीचा परिचय दिला अन प्रेत शवविछेदनाकरिता पाठविले व शंकरपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून याची नोंद घेतली.
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्र