Today : 04:07:2020


त्या कार्यकर्त्याच्या अपघाती मृत्यूची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा; बादल उराडे यांची मागणी

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
बल्लारपूर, सुजय वाघमारे
: बामणी बल्लारपूर महामार्गावर खड्यांमुळे झालेल्या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष महेंद्र लोखंडे यांचा दुचाकीने येत असतांना बामणी बल्लारपूर महामार्गावर अपघात होऊन मृत्यू झाला. याला सार्वजनिक बंधकाम विभागाचे संबंधित अधिकारी जवाबदार असून, या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष बादल उराडे यांनी पोलीस निरीक्षकाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. बल्लारपूर-बामणी महामार्गावरील डांबर रोडच्या बाजूला पुथपाठ सपाट करण्याचे काम चालू होते. दि.८ जून रोजी मृतक लोखंडे हा आपल्या पत्नीसह दुचाकीने येत असतांना गुरुनानक महाविद्यालया समोर याच ओबाळढोबल पुथपाठ वरील खड्यामुळे तोल जाऊन त्यांचा मृयु झाला. 
     काम सुरू असतांना जनतेला सावध करणारे बॅरिकेट्स, रेडियम अथवा फिती लावणे गरजेचे होते. पण संरक्षण संबंधी कोणतेही काम बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदाराने न केल्यामुळेच लोखंडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप उराडे यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांच्या हलगर्जी पणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप लावत सबंधितांवर भादवि ३०२ कलमान्वे गुन्हा दाखल करण्याची मागणीही बादल उराडे यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2020-06-29


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत