Today : 04:07:2020


वारजे परिसरतील रिक्षाचालकांना आणि भजनी मंडळातील काही गरजवंताना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

विदर्भ टाईम्स न्युज : पुणे 
पुणे, सचिन दांडगेपाटील :
शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या यांचे हस्ते वारजे परिसरातील भजनी मंडळातील काही गरजवंतांना कोरडा शिधा कीट आणि अतुलनगर रिक्षा स्टॅन्डवरील ३० रिक्षाचालकांना ५ किलो आटा पाकीटे, कॉटनचे वॉशेबल मास्क, अर्सेनिक अल्बम ३० च्या रोगप्रतिकारक शक्तीवाढीच्या गोळ्या यांचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण पुणे शहरात भाजपचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे गरजवंताच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. तीन महिन्यानंतरही भाजपाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडत नाही याचा विशेष आनंद होत असल्याचे शहराध्यक्ष मुळीक यांनी सांगितले. याप्रसंगी प्रतिक देसरडा, संतसेवक कैलास देवकर, पै. आप्पा दांगट, संदीप कडु, सलीम शाह, अनंता गांडले, अमजद अन्सारी, मुकुंद जाधव, सुरज भालेराव यांचेसह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 
     या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दांगट यांनी केले होते. कोरोनाच्या संकट काळात दांगट यांनी मागील 3 महिन्यांपासून सातत्याने अन्नधान्य वाटप कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. समाजात राहत असताना त्याचे काही तरी देणे लागते, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, उत्तरप्रदेशमधील काहींना गावांकडे जाण्याची सोय सुद्धा त्यांनी करून दिली.मदत नव्हे कर्तव्यच म्हणून भारतीय जनता पार्टी, पुणे शहरतर्फे स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
News - Pune | Posted : 2020-06-29


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत