Today : 03:04:2020


गडचांदुर तालुका निर्मितीसाठी जनता आक्रमक... (आश्वासन पुरे .. आता कृती हवी)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- गडचांदुर तालुक्याची निर्मिती व्हावी यासाठी गेल्या कित्येक वर्षा पासुन येथील नागरिक लढा देत आहे. मात्र प्रत्येक वेळी शासनाच्या वतीने आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. अधिवेशनात मोर्चे काढले, पत्र व्यवहाराची मालीका चालवली, गत वर्षी येथील बसस्थानक परिसरात आमरण उपोषण सुद्धा करण्यात आले. मात्र प्रत्येक वेळी शासनाच्या वतीने आश्वासनच पदरी पडले. मात्र आता जनता आश्वासनाला कंटाळून आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. शासनाला पुन्हा एकदा दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी व्यापक असे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे तसेच आगामी हिवाळी आधिवेशनात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती तालुका संघर्ष समिती कडून देण्यात आली आहे.
     तालुका निर्मितीसाठी सध्या ५४ गाव अस्तित्वात असून राजुरा व जिवती या दोन तालुक्याच्या सिमा भागातील काही गावांचा समावेश केल्यास ६५ ते ७० च्या जवळपास गाव मिळवुन गडचांदुर तालुक्याची निर्मिती होऊ शकते. यासाठी नागरिकात जागृक्ता व आंदोलनाची व्यापक्ता वाढविली जात आहे. तालुका अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील गल्ली, घर, लहान, मोठ्या दुकानांच्या भिंतीवर "गडचांदुर तालुका झालाच पाहिजे" असे घोष वाक्य लिहीण्याचे काम समिती तर्फे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. 
     गडचांदुर शहरातून आज याची सुरूवात करण्यात आली असुन ज्या - ज्या ठिकाणी तालुका संबंधी घोष वाक्य लिहिले जात आहे त्या - त्या ठिकाणी नागरिक स्वत: गडचांदुर तालुका झाला पाहिजे अशे नारे देताना दिसत आहे. एकूणच तालुका व्हावा अशी इच्छा प्रत्येक नागरिकांची असुन ज्या प्रकारे सर्वांच्या सहकार्याने शहराला नगर परिषदेचा दर्जा मिळाला त्याच प्रमाणे तालुका ही मिळवू असे मत गडचांदुर तालुका संघर्ष समितीचे असून वारंवार शासन देत असलेल्या आश्वासना विरूद्ध जनतेचा रोष लक्षात घेता यंदा कोणत्याही परिस्थितीत गडचांदुरला तालुक्याचा दर्जा मिळविल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे चित्र सर्वत्र अनुभवास येत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-23


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-
  मुलचेरा येथील स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे आज दिनांक ०९ ज