Today : 08:08:2020


प्रत्येक शेतकऱ्याला पिककर्ज मिळवून द्यावे : पालकमंत्री सुनिल केदार

विदर्भ टाईम्स न्युज : वर्धा 
वर्धा :
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांसोबतच कृषि क्षेत्राला प्राधान्य देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी खरीप पिक कर्जापासुन वंचित राहू नये यासाठी  बँकांनी अपात्र केलेल्या  पिककर्ज प्रकरणाची नोडल अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी  तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या. केदार यांनी आज तहसील स्तरावरील बँक शाखेला भेट देऊन तहसील कार्यालयात पीक कर्ज प्रकरणांचा बँक शाखेनिहाय आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सेलू येथे झालेल्या बैठकीत आमदार समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे,  जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे,  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, तहसिलदार महेद्र सोनवणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बिरेद्र कुमार उपस्थित होते. 
     वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त कापूस खरेदी करुन राज्यात अव्वल क्रमांक मिळविला तसाच पिककर्ज वाटपात सुद्धा जिल्हा राज्यात प्रथम आणावा व येत्या दोन दिवसात पिक कर्ज प्रकरणे निकाली काढावेत असे  निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. बँकांनी अपात्र ठरविलेल्या पिककर्ज प्रकरणाची यादी  बँकाकडून प्राप्त करुन घ्यावी. तालुकास्तरावर तहसिल, सहायक उपनिबंधक, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा परिषदचे कृषि अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून तपासावी.  प्रत्येक नोडल अधिकांऱ्याने त्यांना नेमून दिलेल्या बँक शाखांना भेटी देऊन  बँकांनी त्रोटक कारणाने कर्जप्रकरणे अपात्र ठरविल्यास  त्रुटी पूर्ण करण्यास बँकांना सांगावे. 
     तसेच  शेतकऱ्यांवरील इतर कर्जामुळे पिक कर्जाची प्रकरणे अपात्र ठरविली असल्यास ओटीएस  मध्ये स्थानांतरण करुन पिककर्ज प्रकरणे मंजूर करण्यात यावीत, अशा  सूचना श्री.केदार यांनी दिल्या. नोडल अधिकाऱ्यांनी बँक भेटीप्रसंगी कर्जमाफी योजनेतील  शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झालेली  प्रकरणे तसेच  ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांची सुद्धा तपासणी करावी, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस शेतकऱ्यांना पिक विम्याचा मोठा आधार मिळतो  त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांला पिक विमा काढण्यासाठी बँकांनी प्रोत्साहित करावे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री सुनिल  केदार यांनी जाम येथील  बँक ऑफ इंडिया, हिंगणघाट येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांना भेटी देऊन पिक कर्ज प्रकरणाची चौकशी केली. 
News - Wardha | Posted : 2020-08-01


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur