Today : 08:08:2020


अहेरी ‘चिंचूगुंडी’ शेतशिवारात वीज पडुन एक महिला ठार तर १० जण जखमी

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली 
अहेरी :
तालुक्यातील चिंचूगुंडी गावामध्ये कापसाच्या पिकाला औषधी टाकण्यासाठी गेलेल्या मजुरांवर दुपारी २.३० वाजता च्या सुमारास वीज कोसळून १ महिला जागीच ठार झाली तर इतर ९ जण जखमी असून त्यांच्यावर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर मजुर दुपारी पिकावर औषधी फवारणी केल्यानंतर जेवण करून विश्रांती घेत होते, दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला, पावसापासून बचाव करण्यासाठी हे मजूर आंब्याच्या झाडा जवळ उभे होते, तेंव्हाच विज कोसळल्याने त्यातील एक महिला जागीच ठार झाली तर अन्य ९ मजूर जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले आहे. यामध्ये पोसक्का चिन्ना तोटावार वय ३५ रा.चिंचूगुंडी जागीच ठार झाल्या तर अरविंद मल्लेश गुम्पा वय ८ रा रेगुंटा, लक्ष्मी मलेश गुम्पा वय ४० रा रेगुंटा, गणपत नागना कुमराम वय ३८, सारका लचमा पानेम वय १५, नागुबाई बापू पानेम वय २२, वैशाली लिंगा तोटावार वय १८, सुनीता श्रीकांत टेकुलवार वय २५, स्नेहा शंकर पानेम वय १७, मलेश्वरी शंकर पानेम वय ३५ आणि इतर एक त्यांचे नाव अद्याप कळले नसून १० जखमी सर्व जण चिंचूगुंडी येथील रहिवासी आहेत. रुग्णालयातील अधिपरिचारिका व डॉ.चेतन इंगोले, डॉ.रवींद्र वाठोरे यांनी जखमीं मजुरांवर तात्काळ उपचार सुरू केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबलू भैयाजी हकीम व शाहीन भाभी हकीम यांनी रुग्णालयात येऊन रूग्णांना भेट देऊन विचारपूस केली.




News - Gadchiroli | Posted : 2020-08-01


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur