Today : 08:08:2020


राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था  
नवी दिल्ली :
राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं आज निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अमर सिंग यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. मात्र आज उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते सिंगापूरमधील रूग्णालयात दाखल होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं होतं. अखेर वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यापूर्वी 2013 मध्ये त्यांना किडनीची समस्या देखील उद्भवली होती. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी त्याचे घनिष्ट संबंध होते. मात्र दरम्यानच्या काळात या दोघांच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. अमिताभ आणि अमर सिंह यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. 2016 मध्ये त्यांची खासदार म्हणून निवड झाली होती. केंद्रामध्ये काँग्रेसप्रणित युपीएचं सरकार असताना अमर सिंह यांचं नाव सातत्याने चर्चेत राहिलं. मुलायम सिंग यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख असताना त्या काळात अमर सिंह यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
News - Delhi | Posted : 2020-08-01


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur