Today : 27:02:2020


अहेरीचे संवर्गविकास अधिकारी म्हैसकर हे अणाधिकृतपणे गैरहजर विकास कामावर होत आहे परिणाम

प्रकाश दुर्गे, अहेरी :- पंचायत समीती अहेरीचे संवर्गविकास अधिकारी प्रफुल्ल म्हैसकर हे दिनांक १८ नोव्हेंबर पासून अनाधिकृतपणे गैरहजर असल्याने विकास कामावर त्याचा परिणाम पडत आहे. दैनंदिन शासकीय कामकाजात अळथळे निर्माण होत आहेत. महत्वाच्या फाईली पडून आहेत, घरकुल योजनेचे तीन तेरा वाजले आहे, घरकुल लाभार्थाना त्यांचे कामाचे हप्ते मिळत नसल्याने पुढी कामे टप्प पडली आहेत, शंभर किलोमीटर अंतरावरुन पैसे खर्च करुण  आलेल्या गरीब लाभार्थाना कार्यालयात येवून खाली हात परत जावे लागत आहे. 
     बि.डी.ओ. म्हैसकर यांचे नित्याचेच झाले आहे. जरी ते मुख्यालयाल असले तरी ते कार्यालयात न येता शिपाया व्दारे फाईलीचे गट्टे घरीच बोलावून घेत असल्याची माहिती आहे ते स्वत: कार्यालयात येत नसल्यामुळे त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर नियंत्रण नाही. आप आपल्या पद्धतीने मनमाणी कारभार सुरु आहे. काही मोजके कर्मचारी, अधिकारी सोडले तर टेबलवर कुणीही भेटत नाही. दुपारनंतर तसेच पहिल्या व तिसऱ्या शनिवारी तर कार्यालयाची परिस्थीती फारच वाईट असते. 
     या सर्व समस्यासाठी केवळ संवर्गविकास अधिकारी यांचे ढिसाळ व्यवस्थापन कारणीभूत आहे असे अधिकारी जर असल्यास विकास कामांना गती कशी मिळेल? शासनांनी ठरवून दिलेले विविध कामाचे उद्दिष्ट कसे पुर्ण होईल? म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने संवर्गविकास अधिकारी म्हैसकर यांचेवर योग्य कारवाई करुन नियमीत संवर्गविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी अहेरीकर नागरीकांकडून केली जात आहे.
कोट - १ : "संवर्गविकास अधिकाऱ्यांनी या कार्यालयाला कोणतीही सुचना दिली नाही. त्यांनी वरिष्ठांकडून रजा मंजूर करुन घेतली किवा नाही. याबाबत सुध्दा या कार्यालयाला माहिती नाही दिनांक १८ नोव्हेंबर पासून संवर्गविकास अधिकारी हे कार्यालयात येत नाही हे खरे आहे." (एम.डी सोनटके, साहाय्यक गटविकास अधिकारी, प. स. अहेरी
कोट - २ : "योग्य माहिती घेऊन नियमानुसार कारवाई केली जाईल प्रत्यक्ष लक्ष घातले जाईल" (शांतनू गोयल, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली)
News - Gadchiroli | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli