Today : 17:11:2019


१३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प यशस्‍वीपणे पूर्ण होणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

"वरिष्‍ठ वनअधिकाऱ्यांच्या दहाव्‍या परिषदेचे पुण्‍यात वनमंत्र्यांच्‍या हस्‍ते उदघाटन" 
विदर्भ टाइम्स न्यूज / येत्‍या वर्षात जुलै महिन्‍यात राज्‍यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प करण्‍यात आला आहे. या संकल्‍पपुर्तीच्‍या दृष्‍टीने वनअधिकाऱ्यांनी केलेली तयारी निश्‍चीतच समाधानकारक असुन वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाच्‍या फलस्‍वरूप १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प सुध्‍दा आपण यशस्‍वीपणे पूर्ण करू व ही वृक्ष लागवड सुध्‍दा विक्रमी ठरेल असा विश्‍वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.
     दिनांक २३ नोव्‍हेंबर रोजी यशदा पुणे येथे आयोजीत वरिष्‍ठ वनअधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्‍या उदघाटन समारंभात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या लेखी संबोधनात वरील भावना व्‍यक्‍त केल्‍या. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उदघाटन श्री संत ज्ञानेश्‍वर यांच्‍या संजीवन समाधिवरील अंजनवृक्षाच्‍या एका रोपटयाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते पाणी देवून करण्‍यात आले. यावेळी बोलताना वनमंत्री मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, वरिष्‍ठ वनअधिकाऱ्यांच्या परिषदेची संकल्‍पना आपण मांडली व त्‍या माध्‍यमातुन वनसंवर्धन व संरक्षणाच्‍या प्रक्रियेला गती आली. आज या परिषदेची दशकपुर्ती झाल्‍याबद्दल त्‍यांनी वरिष्‍ठ वनअधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 
     यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री भगवान, महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री.उमेशकुमार अग्रवाल आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यादरम्‍यान १३ कोटी वृक्ष लागवड मोहीमेच्‍या तयारीचा आढावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला व याबाबत समाधानही व्‍यक्‍त केले. रोपांच्‍या नैसर्गीक पुनरूज्‍जीवनाबाबत यावेळी चर्चा झाली. वृत्‍त निहाय व जिल्‍हा निहाय रोप लागवड नियोजनाचा आढावा यावेळी वनमंत्र्यांनी घेतला. हॅलो फॉरेस्‍ट या हेल्‍पलाईनच्‍या कामकाजाबाबत आढावा घेत आलेल्‍या तक्रारींचे त्‍वरीत निराकरण करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. ग्रिन आर्मी रजिस्‍ट्रेशन चा आढावा सुध्‍दा यावेळी घेण्‍यात आला. नदी पुनरूज्‍जीवन कार्यक्रमादरम्‍यान नदयांच्‍या दोन्‍ही काठांवरील एक किलो मिटर पर्यंतच्‍या सर्व जमिनींवर वृक्ष लागवड करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी वनअधिकाऱ्यांना दिल्‍या. जिवंत रोपांची टक्‍केवारी काढून जास्‍तीत जास्‍त रोपे जिवंत राहण्‍यासाठी योग्‍य ती काळजी घ्‍यावी, निगा राखावी यासंबंधी योग्‍य नियोजन करावे, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. मग्रोरोहयो अंतर्गत करावयाच्‍या वृक्ष लागवडीबाबत सुध्‍दा त्‍यांनी यावेळी आढावा घेतला. 
     उदघाटन सोहळयात ग्रिनींग ऑफ महाराष्‍ट्र, आयएफएस ची ५० वर्षे, पर्यावरण दिनाविशेष, हरित निर्णयाची तीन वर्षे या पुस्‍तकांचे विमोचन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. वरिष्‍ठ वनअधिकाऱ्यांची ही परिषद दोन दिवस चालणार असुन यात विविध महत्‍वपूर्ण विषयांचा आढावा घेण्‍यात येणार असुन विस्‍तृत चर्चा करण्‍यात येणार आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

दोन वर्षात या ठिकानचा चेहरा - मोहरा बदललेला दिसेल : आ.अॅड.धोटेंची ग्वाही (अमलन

2018-01-08 | News | Chandrapur