Today : 05:07:2020


अहो साहेब, गडचांदुर बस स्थानकसाठी जागा निश्चित केली का ? (औद्योगिक शहर मात्र विविध समस्याग्रस्त)

"प्रसाधनगृह समोर बसलेले प्रवासी बसच्या प्रतीक्षेत"
सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपना तालुक्यातील गडचांदुर हे औद्योगिक शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. इतर शहरांच्या नागरिकांना याठिकाणी सर्व व्यवसथित सूरु अहे असे वाटते, यात काही गैर नाही मात्र स्थानिकांना जीवन जगण्यासाठी याठिकाणी कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची कल्पना केलेलीच बरी. प्रदूषण, शुद्ध पाणी, वाहतुक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, प्रकल्प असून बेरोजगारीचे संकट, धरणे असून पाण्याचे संकट, सुसाट बाईकर्सवर नियंत्रण नसल्याने जीवाचे संकट असे कित्येक लहान मोठी संकट व समस्या नागरिक निमुटपणे सहन करित आहे. यावर पुन्हा बस स्थानकच्या समस्येची भर पडली आहे.
     सध्या दोन जागेची पाहणी करण्यात आली आहे. या पैकी एक जागा निश्चित करून लवकरच भव्य व सर्व सुविधा युक्त बस स्थानकची निर्मीती करण्यात येणार असल्याचे वक्तव्य आमदार साहेबांनी स्थानिक नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या पदग्रहण समारंभात केले होते. मात्र अंदाजे चार महिन्यांच्या कालखंडा नंतर ही बस स्थानका विषयी काहिच हालचाली दिसत नसल्याचे पाहून "अहो साहेब, गडचांदुर बस स्थानकसाठी जागा निश्चित केली का ?" असा प्रश्न आता जनता विचारत आहे. काही महिन्या पुर्वी येथील मुख्य मार्गाचे काम सुरू असताना जुना प्रवासी निवारा तोडण्यात आला. तेव्हा पासुन अनेक प्रवासी अक्षरश: प्रसाधनगृहा समोर तसेच इतर ठिकाणी बसुन बसची वाट पहात असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. मोठ्या बस स्थानकची निर्मिती होई पर्यंत रोडच्या दोन्ही बाजुला आधूनिक पद्धतीचा लहान प्रवासी निवारा तरी उभारा, अशी मागणी नागरिकांची होती मात्र संबंधितांनी याकडे कानाडोळा करत प्रसाधनगृहाच्या बाजूलाच टिनाचे वाहतूक कार्यालय बनविले. वाहतूक नियंत्रक आत आणि शाळकरी मूले व सर्व प्रवासी उन्हाचे चटके सहन करत इकडे - तीकडे उभी दिसतात. यामूळे अनेक वृद्धांना विशेषत: लहान मुलं सोबत असलेल्या महिलांना कमालीचा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. व्यवस्थित बसण्या करिता प्रवाश्यांची धडपड संबंधितांनी लक्षात घेऊन उद्धभवलेली बस स्थानकची समस्या त्वरित मार्गी लावावी अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur

चिमुर :- चिमुर तालुक्यातील क