Today : 23:09:2020


यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली जीएमसीच्या डॉक्टरांची झाडाझडती

विदर्भ टाईम्स न्युज : यवतमाळ 
यवतमाळ :
जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातच मृत्युंचा आकडाही दिवसेंदिवस फुगत चालला आहे. प्रत्येक दिवशी सरासरी पाच कोरोनाबाधित रुग्ण दगावत आहे. या बाबीची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांची चांगलीच झाडाझडती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या 15 ते 20 डॉक्टरांना स्वत:च्या कॅबिनमध्ये पाचारण केले. यापूर्वीसुध्दा अनेकदा समज देऊनही मृत्यूच्या आकडा कमी करण्यासाठी डॉक्टरांना सांगण्यात आले होते. त्यातच वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक डॉक्टर खाजगीरित्या रुग्णसेवा करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह यांना वारंवार प्रशासनाने सूचना केल्या होत्या. मात्र या सूचनांकडे अधिष्ठातांसह डॉक्टरांनी दुर्लक्ष करून आपली खाजगी दवाखाने थाटात सूरू ठेवली.
     आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या. किती वेळा कोव्हीड वॉर्डात डॉक्टरांनी भेटी दिल्या याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांकडे विचारणा केली असता डॉक्टरांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे रोस्टर तीन – तीन महिन्यांपासून अपूर्णावस्थेत असल्याचे आढळले. एवढेच नाही तर रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू का होत आहे, असे विचारल्यावर डॉक्टरांकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत डॉक्टरांना तंबी दिली. तसेच खाजगी रुग्णालय चालविणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना त्वरीत शो – कॉज नोटीस देण्याचे निर्देश अधिष्ठाता आर. पी. सिंह यांना दिले. 
     वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार देणे हे डॉक्टरांचे प्राथमिक कर्तव्य आहे. यात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. भविष्यात कोव्हीड, नॉन कोव्हीड रुग्णांवर योग्य उपचार करावे. तसेच मृत्यू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्वत:च्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासकीय कारवाई करण्यास बाध्य करू नका, असा सज्जड दमही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह, डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह 15 ते 20 डॉक्टर उपस्थित होते.
News - Yatmal | Posted : 2020-09-15


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


ज्ञान विकासा बरोबर शारीरिक विकास व्हावा : श्रीधर दुग्गीरालापाटी

2018-02-04 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
प्रतिनिधी कमलापुर :-
कमलापूर वनवासी भागात संपूर्ण भा