Today : 23:09:2020


कांदा निर्यात बंदीचा केंद्राचा निर्णय अनाकलनीय; निर्यातबंदी मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : अमित विलासराव देशमुख

विदर्भ टाईम्स न्युज : लातुर
लातुर
: शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा हे उत्पादन जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळणाऱ्या केंद्र शासनानेच आता कांद्यावर निर्यातबंदी घालण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला आहे. हा निर्णय ताबडतोब परत घेऊन कांदा उत्पादकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख योनी केले आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबाबत अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, कोणतीही पूर्वकल्पना न देता १४ सप्टेंबर रोजी केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय तडकाफडकी जाहीर केला आहे. या निर्यातबंदीमुळे थोडी भाववाढ होण्याची वाट पहात थांबलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. उन्हाळ्यात कांद्याचे भाव पडलेले होते त्यातून उत्पादन खर्चही निघत नव्हता. 
     त्यामुळे  शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री न करता त्याची साठवणूक करून ठेवली होती. या परिस्थितीत आता पुन्हा कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव एकाच दिवसात २५% टक्क्यावर खाली आले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग खूप मोठ्या अडचणीत आला आहे. सद्यस्थितीत कांद्याचे भाव फारसे वाढलेले नसताना आणि निर्यातबंदी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नसताना केंद्र सरकारने असा निर्णय का घेतला ही बाब अनाकलनीय आहे, असे सांगून अनेक संकटामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने ही निर्यात बंदी ताबडतोब परत घ्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
News - Delhi | Posted : 2020-09-16


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


जुन्या बसस्थानकाला तोडणाऱ्यावर कारवाईसाठी साखळी उपोषण सुरु

2018-02-04 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपुर
प्रतिनिधी घुग्घूस :-
जुन्या बसस्थ