Today : 10:04:2020


अहेरी विभागातील धान खरेदी केंद्राचे तिडा कायम

प्रतिनिधी, बोरी :- आज झालेल्या बैठकीत अहेरी उपविभागातील धान खरेदी केंद्राचे तीडा कायम अहेरी विभागात पाच तालुके समावेश असून या तालुक्यातील मुख्य भाग शेती असून जवळपास बहुतांश ही शेती निसर्गावर अवलंबून असते. अहेरी विभागातील धान खरेदीचा कारभार हा उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी यांच्या मार्फतीने राबविण्यात येतो. या विभागात एकूण ३३ धान खरेदी असून सदर धान खरेदी ही आदिवासी विविध सहकारी संस्था यांच्या माध्यमातून होते. या विभागतील धान खरेदी कोट्य वधीचे होत असून या भागाची समस्या अजूनही कायम व ताज्या आहेत. वेळेवर माल न उचलणे, मालाच्या मोजमापात पारदर्शकता नसणे अश्या अनेक समस्या या भागात आहेत.
     सन २०१६-१७ या हंगामात अहेरी विभागातील संस्थानी खरेदी केली त्यात संस्थांना कमिशन मिळणे गरजेचे होते त्यामुळे संस्था सचिवांचे वेतन व इतर व्यवस्थापन खर्च पूर्ण करण्यासाठी रक्कम ८० टक्के पाहिजे होती पण खरेदी केलेल्या मालाची उचल करण्याची जबाबदारी ही महामंडळाकडे असते त्यामुळे महामंडळाचे माल उचल करण्यास विलंब केला आणि मोठं मोठ्या मिलर्सने आपल्या मन मर्जीने मालाचे मोजमाप केले ह्यात संस्थांचे कुठूनही चूक नाही पण सन २०१६-१७ या हंगामातील संस्था संस्थांना मिळणारा ६० टक्के कमिशन हा मिळालेला नाही आणि संस्था ह्या अवाजवी घटी तुटत गेल्या ह्या संस्थांना आपल्या खरेदी केंद्रावर घट तुटत असल्याने आपल्या कडून आपल्या कमिशन मधून दिड पट रक्कम का वसून करू नये असे महामंडळाने फार्मात सोडले त्यात संस्थाचे आर्थिक शोषण हे महामंडळ करत आहे आणि ज्या व्यवसायात संस्थेला वेळोवेळी नुकसान सहन करावा लागत असल्याचे व्यवसाय करणे गरजेचे नाही असे संस्था सचिवांनी स्पष्ट आपले मत मांडले असता.
     यात संस्थाचा व संस्था सचिवाच्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय संस्थानी धान खरेदी केंद्र सुरु करणार नसल्याचे एका नेवेदनात म्हटले आहे सिरोंचा तालुक्यातील १) अमरादी २) असरल्ली ३) वडदम ४) अंकीसा या चार संस्थांना हंगाम २०१६-१७ मध्ये ६० टक्के कमिशन अदा करण्यात आले आणि हे ४ खरेदी केंद्र उघड्यावर धान खरेदी करत असल्याने मालाची उचल हि वेळीच करण्यात आली त्यामुळे ह्या संस्थांना घटी तुटीचा सामना न करता थेट कमिशन साठी पात्र झाला व उर्वरित २९ संस्थाचे माल संस्था स्तरावर ८ ते ९  महिने पडून होता त्यामुळे उष्णता हि ४६ ते ४८ सेल्सिअस होती आणि गोदामातील व उघड्यावरील मालाची गोदामात क्षमता नाल्याने त्यात ठेवणे शक्य नाही त्यामुळे अहेरी विभागातील काही प्रमाणात आकली तूट ही नैसर्गिक तूट म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन सस्थांना सन २०१६-१७ चे कमीशन अदा करावे आणि संस्था संपूर्ण मागण्या पूर्ण करण्यात यावे मागण्या मंजूर न केल्यास हंगाम २०१७-१८ खरेदी केंद्र सुरु करणार नसल्याचे एक निवेदनात म्हटले आहे. 
     संस्था सचिवांना उप प्रादेशिक व्यवस्थापक मुडेवार यांचे मार्फतीने निवेदन सदर केले त्यावेळी संस्थेचे सचिव अहेरी, एटापल्ली, भामरागढ़, सिरोंचा व मुलचेरा या तालुक्यातील सस्था सचिव उपस्थित होते. 
News - Gadchiroli | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli