Today : 10:07:2020


चिमुर शहरात दोन वर्षात साफ सफाईवर ५६ लाख ५८ हजार ४९० रुपये खर्च करून हि वाढलेल्या मच्छराने नागरीक त्रस्त नगर परिषदेचे स्वच्छतेकडे डोळे झाक - नगरसेवक विनोद ढाकुणकर

फिरोज पठाण, चिमूर :- चिमूर नगर परिषद स्थापनेला दोन वर्षांचा काळ पूर्ण झाला असून मात्र सत्ताधारी व प्रशासणाचे प्रभावी कामाचे नियोजन नसल्याने नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .विशेषता चिमूर शहरात  स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असुन यामुळे शहरात गंदगी व गंदगीने मच्छरांचा प्रभाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन याकडे नगर परिषदेचा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवक विनोद ढाकुनकर यानी केला असून शहरात मच्छरांचा प्रकोपावर उपाय करण्याची  करण्याची मागणी केली आहे.
     चिमूर नगर परिषद क्षेत्रात डुकरांचा मुक्त संचार असुन चिमूर शहरातील नाल्यामधून योग्य प्रकारे गाळ उपसा तसेच यात नियमितता नाही ज्यामुळे नाली मधील मच्छरांचे प्रमाण मोठया प्रमाणात होत आहे. यामुळे मच्छरांचा प्रकोप वाढला आहे. तसेच डेंगू, फायलेरीया, मलेरिया सारखे आजार होण्याची शक्यता वाढली  आहे. मच्छर निर्मुलन करण्याकरीता वेळोवेळी नाली सफाई तसेच नालीत डबक्या मध्ये औषध फवारणी करण्याविषयी तोडी व निवेदना द्वारा अनेकदा विंनती करण्यात आली, मात्र थातुर मातुर स्वच्छता करून सगळीकडे फवारणी झाल्याचे सांगण्यात येते. सन २०१६-१७ मध्ये नाली सफाई, घंटागाडी इत्यादीवर ३६ लाख ६७ हजार  ९३० रुपये खर्च करण्यात आले तर चालु वर्षात १९ लाख ९० ह्जार ५६० रुपये खर्च करण्यात आले. मात्र एवढा निधी खर्च करून सुद्धा जैसे थेच परीस्थीती आहे. तसेच नगर परिषदेने फवारणी कधी, केव्हा व कुठे केली असा प्रश्न केला असता कुणीही समर्पक उत्तरे देत नसल्याचे दिसुन येते. 
     चिमूर नगर परिषद स्वछता अभियान अंतर्गत घन कचरा हा उमा नदीच्या काठावर टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधीचा घमघमाट सुटलेला असुन यामुळे परीसरातील नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे तोंडी, लेखी तसेच वर्तमान पत्रातुन प्रसिद्ध झाले तरी सुद्धा नगर परीषद सत्ताधारी आणी प्रशासण झोपेचे सोंग घेऊन स्वस्थ बसलेली असल्याचा तिव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. त्या ठिकाणा मध्ये व दुतर्फा नाल्या मधून  मच्छरांची पैदास  वाढत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  नगर परिषद ने  मच्छर निर्मुलनाकरीता फवारणी करण्याची मागणी नगरसेवक विनोद ढाकुनकर यांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli