Today : 13:11:2019


गडचांदुरातील प्रभाग क्रं.१ चा काही भाग विकासा पासुन वंचित (नगराध्यक्षांनी लक्ष देण्याची गरज)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- गडचांदुरातील ग्रामपंचायत विसर्जित करुन अडीच वर्षा पुर्वी नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली.निवडणूकी नंतर भाजप, शिवसेनेच्या मदतीने काॅग्रेस पक्षाने सत्ता स्थापित करून पहिल्या नगराध्यक्षाचा मान काॅग्रेसच्या सौ. विद्याताई कांबळे यांना दिला.तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे सचिन भोयर विराजमान झाले.राकाॅचे सर्वात जास्त नगरसेवक असूनही त्यावेळी यांना सत्ता स्थापनेचे समिकरण जमले नाही.अनेक वर्षा पासुन खुंटलेल्या शहराच्या विकासाला चालना देण्याचे आवाहन नवनियुक्त सत्ताधायां पुढे होते.करोडोंचा निधी खर्चुन चार ही प्रभागात सिमेंट रस्ते,नाल्या व इतर विकास कामे केल्याचे दावे केले जात असले तरी पाहिजे तसा शहराचा विकास सत्ताधायांना करता आला नसल्याची टिका सतत विरोधी पक्षा कडून होत होती.
     शेवटी अडीच वर्षा नंतर दुसयांदा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदा साठी निवडणूक पार पडली.पुर्वी विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेले यंदा सत्ताधारी झाले तर सत्तेत असलेले विरोधी शिवसेना, भाजपने मात्र पुर्वी काॅग्रेसला समर्थन दिले तर आता राकाॅला दुसरी महिला नगराध्यक्षा म्हणून राकाॅच्या सौ. विजयालक्ष्मी अरविंद डोहे, तर भाजपच्या सौ.आनंदीताई रामसेवक मोरे उपाध्यक्षपदी या महिला गेल्या दोन महिन्या पुर्वी विराजमान झाल्या. मात्र या दोन्ही वेळा सेना, भाजप सत्ताधाया सोबतच नांदत आहे याला नशिबच म्हणावे लागेल हे तेवढेच खरे.
     आता नविन सत्ताधायांनी शिल्लक असलेली विकास कामे तातडीने पुर्ण करावी अशी मागणी होत असतानाच येथील प्रभाग क्रं.1 झुल्लूरवार काॅम्पलेक्सच्या मागील भागात आता पर्यंत विकास पोहचलाच नाही.येथील रहिवासी गेल्या अनेक वर्षा पासुन रोड, नाल्या व इतर सुविधांपासुन वंचित असुन निर्वासी जीवन जगत आहे.नाल्या नसल्याने पाण्याचे डबके तयार झाले असुन डुकरांनी बस्तान मांडले आहे.सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र असुन मागील ग्रामपंचायत पासुन तर आत्ताची नगर परिषदे पर्यंत अनेक वेळा निवेदना द्वारे या भागाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचे प्रयास करण्यात आले परंतू काहीच उपयोग झाला नसल्याची खंत येथील त्रस्त नागरिकांनी सदर प्रतिनिधी पुढे व्यक्त केली.आता तरी नवनियुक्त सत्ताधायांनी आमची व्यथा जाणून घ्यावी. नगराध्यक्षानी स्वत: याकडे लक्ष देऊन सदर भागाची पाहणी करून त्वरित समस्याचे समाधान करावी अशी मागणी या भागातील रहिवाश्यांनी  केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-24


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur