Today : 21:09:2019


शारदा अंबिका पावर प्लांट च्या कामगारांना परत घ्या आणि थकित पगार देण्यात यावे, हिंद मजदूर कामगार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

फिरोज पठाण, चिमूर :- चिमूर येथील एम.आय.डी.सी. परिसरात शारदा अंबिका पावर प्लांटची स्थापना मागील दहा वर्षांपासून सुरु असताना प्लांटच्या अनियमित कारभाराने व्यवस्थापक सत्यजित बोयना यांनी कामगारांना कोणतेही पूर्व सूचना न देता अचानक पावर प्लांट बंद केला असून अनेक महिन्या पासून पगार न दिल्याने उपासमारीची वेळ आल्याने भारतीय मजदूर संघ अंतर्गत दि कमर्शिअल अँड इंडस्ट्रीज लेबर युनियन, चिमूरचे वतीने नुकताच मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर तहसीलदार चिमूर यांना निवेदन देऊन पुनछ: प्लांट सुरु करुन कामगाराना कामावर घेऊन थकित रक्कम देण्याची मागणी करण्यात आली.
     प्लांट सुरु करुन कामगारांंना रोजगार परत देण्यात यावा, थकित पगार/ रक्कम कामगारांना देण्यात यावा, सर्व कामगारांना बोनस अधिनियम प्रमाणे वेतन  देण्यात यावे, कामगारांचे कपात करण्यात आलेली  पीएफ ची रक्कम त्वरित कामगारांच्या खात्यात जमा करून द्या आणि कंपनी व्यवस्थापक यांनी कामगाराना बेरोजगार केल्यामुळे  त्यांचेवर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्या घेऊन भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हा महामंत्री हेमराज गेंडे, संघटनमंत्री मनोहर साळवे, किशोर राहुड व घनश्याम नंदा यांचे नेतृत्वात मोर्चा श्रीहरी बालाजी मंदिरापासून काढून उपविभागीय कार्यालयावर आणण्यात आल्यावर तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
     शारदा अंबिका पावर प्लांट मधील कामगारांचे शोषण व पिळवणूक होत असल्याने कंपनीच्या कामगारांनी हिंद मजदूर संघाकडे धाव घेतली असून या धडक मोर्च्यात खुशाल आवारी, नारायण हजारे, विनोद उपरकर, किशोर दुरुडकर, गणेश बालपांडे, विजय ननावरे हेमराज दुधनकर, भोजराज नन्नावरे, मधुकर साठोणे, विलास झाडे, प्रशांत रायपूरकर, विनोद बानकर, योगेश डोये, गुलाब डाहूले, रामभाऊ सोनवाने, जनार्धन बोरकर, विकास राणे, नरेंद्र वाकडे,  दशरथ रंदये, मारोती जांभुळे, सतीश नार्लावार, कृष्णा राणे, आदी सर्व कामगार प्रामुख्याने मोर्च्यात सहभागी होऊन उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli