Today : 21:11:2019


एस व्ही जे सी च्या आर डी ग्राहकांची फसवणूक, कार्यालय झाले बंद (ग्राहकांचे जमा केलेली रक्कम देण्याची मागणी)

फिरोज पठाण, चिमूर :- चिमूर व तालुक्यात बेरोजगारांना काम व बचत ठेव नावाखाली शेकडो आर डी एजन्ट यांनी जाळे पसरवून हजारो नागरिकांनी आर.डी. खाते काढून बचत केली होती परंतु ते एस व्ही जे सी चे कार्यलय बंद झाल्याने ग्राहकात तारांबळ उडाली असून एजन्ट यांनी हात वर केले असल्याने फसवणूक झाली असून प्रशासनाने चौकशी करून ग्राहकांची रक्कम देण्याची मागणी भाजयुमो माजी तालुका अध्यक्ष रामदास हेमके यांनी केली आहे.
     एस व्ही जे सी चे एजन्ट हे घरोघरी जाऊन ग्राहकांना फूस लावून आर डी खाते काढत आले होते, शेकडो ग्राहकांनी खाते उघडले होते परंतु काही वर्षे कार्यालय चालले ते कार्यालय पिंपळनेरी रस्त्याच्या बाजूला होते. सध्या स्थितीत ते कार्यालय बंद पडले असल्याने आर डी ग्राहकात तारांबळ उडाली असून ग्राहकांनी एजन्ट कडे धाव घेतली परंतु एजन्ट रक्कम मिळवून देत असल्याचे सांगत आहे. ग्राहकांना मिळलेल्या पावत्या व कागदपत्रे द्या व खर्च १००/- रुपये लागत असल्याचे सांगून परत रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन दिले असले तरी मिळवून दिले नाही. यात ग्राहकांची फसवणूक झालेली आहे या गंभीर प्रकारची दखल प्रशासनाने घेऊन संबंधित एस व्ही जे  सी च्या प्रबंधकांनी ग्राहकांची जमा असलेली रक्कम परत करण्याची मागणी भाजयुमो माजी तालुका अध्यक्ष रामदास हेमके यांनी केली असून न्याय मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे धाव घेणार असल्याचे सांगितले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ ट