Today : 14:08:2020


कान्हाळगाव जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपणा तालुक्यातील कान्हाळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या पिढीला भविष्यात एक जबाबदार नागरीक होण्यासाठी प्राथमिक शिक्षण दिशा देणारी ठरत असते. शासनाने विद्यार्थ्यांना गणवेशासह इतर शिक्षण साहित्य व दुपारच्या जेवनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. अनेक शाळा डिजीटल झाल्याचे पाहायला मिळत असुन शासनाच्या अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच शिकवावे असे आवाहन हिवरकर यांनी केले. 
     भारतीय घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा शिक्षण जि.प.शाळेतुनच झाले. अत्यंत गरीब परिस्थितीत बाबासाहेबांनी शिक्षण घेतल्याचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवत आजच्या घडीला अनेक सुविधा शासनाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहे. याचा पुरेपुर लाभ घ्यावा असे मत हिवरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
     यावेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा कन्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर हे अध्यक्ष स्थानी होते तर मुख्याध्यापक नगराळे, बंडु कुळसंगे, बंडु भोयर, मडावी सर, देविदास जरिले, राजु येरेकर आदींची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाला विध्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी संचालन मडावी सर व आभार राजु ऐकरे सरांनी व्यक्त केले.




News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

</