Today : 21:09:2019


वाहानगाव उपसरपंच प्रशांत कोल्हे विरोधात याचीका उच्चतम न्यायालयाने केली खारीज, (बेकायदेशीर आंदोलन करणे पडले महागात)

फिरोज पठाण, चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यात चिमुर तालुका व शेगाव (बु.) पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या वाहानगावातील दारु विक्रीच्या आंदोलकांनी अख्या महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधत शासन-प्रशासनला बदनाम केले व वाहानगावाबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता भंग होईल असे कृत्य केले. दारु विक्री आंदोलनाचा प्रमुख उपसरपंच प्रशांत कोल्हेला त्याच्या बेकायदेशीर कृत्याबद्दल, प्रशासकीय स्तरावरुन अनेकदा कायदेशीररीत्या समज देण्यात आली. परंतु कायद्याला व प्रशासकीय यंञणेला न जुमानता आपली अहंकारक मुजोरी प्रशांत कोल्हेंनी सुरुच ठेवली होती. अखेर प्रशासनाने यामध्ये गंभीर होत प्रशांत कोल्हे बाबत जिल्हाबंदीचा आदेश काढला.
     या आदेशाविरुध्द उच्चतम न्यायालय मुंबईच्या, नागपुर खंडपीठात तळीपार प्रशांत कोल्हेनी याचीका दाखल केली होती मात्र सुनावनी अंती नागपुर खंडपीठाने तळीपारला दणका देत त्यांची याचीका खारीज केली. शेगाव (बु.) पोलिस स्टेशनचे ठाणेदार, एस.के.बारसे यांनी भक्कम पुराव्यासह, चिमुरचे  उपविभागीय अधिकारी, हरीश धार्मिक यांच्याकडे प्रशांत कोल्हेना तळीपार करण्या सबंधाने अहवाल सादर केला होता. 
     या अहवालाला चिमुर उपविभागीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घेत दि. २६ नोव्हेंबर ला प्रशांत कोल्हे विरुद्ध जिल्हाबंदी आदेश काढला व त्याच दिवस आदेश लागू केला होता. हा जिल्हाबंदी आदेश २० नोव्हेंबर पर्यंत आहे. तळीपार आदेशाविरुध्द, प्रथपत: प्रशांत कोल्हेंनी अनेक राजकीय व समाजीक लोकांची साहानुभूती मिळवीत यासाठी बरेच प्रयत्न केले. 
     परंतु प्रशांत कोल्हेला साहानुभूतीचे बळ कोणीही दिले नाही. अखेर त्याला कायद्यापुढे झुकावे लागले. प्रशांत कोल्हेंनी जिल्हाबंदी आदेशाविरुध्द मुंबई उच्च न्यायालयातंर्गत, नागपूर खंडपीठात याचीका दाखल केली होती. दि.२२ नोव्हेंबर ला नागपुर खंडपीठापुढे सदर याचीकेला अनुसरुन सुनावनी झाली. उपविभागीय अधिकारी, चिमुर व ठाणेदार शेगाव (बु.) यांची बाजु ऐकुन घेत, जिल्हाबंदी आदेश विरुद्धची, प्रशांत कोल्हेची याचीका खारीज केली. या प्रकारे प्रशांत कोल्हेला दुसरा व जबरदस्त कायदेशीर झटका आहे.
     दारुबंदीच्या गोडस नावावर, छूप्या एजेंड्याद्वारे दारु सुरु करण्याचे आंदोलन करुन पाहणार्‍या प्रशांत कोल्हेच्या बेकायदेशीर मुजोरीला प्रशासनाने बरेच झालेले प्रशासकीय स्तरावरुन प्रशांत कोल्हेच्या कायदेशीर मुसक्या आवळणे सुरु केले व जिल्हाबंदी आदेश त्याच्याविरुद्ध काढला. प्रशांत कोल्हे व त्याला साथ देणार्‍या ३३ जनाविरुध्द शेगाव (बु.) पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद आहे. वाहानगावच्या नागरीकांनी कायद्याला महत्त्व न दिल्यास आरोपींचा हा आकडा वाढू शकतो. त्याच्या बरोबर त्याला साथ देणार्‍यांना पोलिस केव्हाही अटक करु शकतात असेच संकेत पोलिस विभागाकडून मिळाले आहेत. परंतु प्रशांत कोल्हेच्या अहंभाव मुजोर प्रवृत्तीला शेगाव (बु.) पोलिस स्टेशनचे ठाणेदार, एस.के.बारसे व चिमुर उपविभागीय अधिकारी, हरीश धार्मीक यांनी लगाम लावला एवढे निश्चित आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टू