Today : 11:07:2020


जिवती येथे ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत, निवास बाधकांमाला प्रशासकीय मान्यता (आमदार अॅड संजय धोटे यांच्या प्रयत्नांना यश)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि.१८ नोव्हेंबर २०१७, नुसार आरोग्यसेवा संचनालय यांचे पत्र, ग्रामीण रुग्णालय बांधकाम दि.१९ ऑगस्ट २०१६, नुसार अतिदुर्गम व डोंगरी भागातील जिवाती तालुका निर्मीती नंतर या ठिकाणी ग्रामीण रुग्णाल्याची निर्मीती व्हावी अशी मागणी नागरिक करीत होते. यापूर्वी येथे प्राथमिक स्वास्थ केन्द्र होते मात्र इमारत अभावी रूग्णांना त्रासदायक व गैरसोयीचे ठरत होते. याबाबत आमदार अॅड.संजय धोटे यांनी आरोग्य मंत्री डॉ.सावतं व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा करून जिवती येथे ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत, वाल कंम्पाउंड, गार्डन, रेन वाटर, नाली, रस्ता, विज तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली होती.
     आमदार धोटे यांनी बाधंकामा करीता १० कोटी ४५ लाखांचे अंदाज पत्रक व विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळविली असून अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा जिवती या तालुक्याच्या ठिकाणी शासन निर्णयामुळे अनेक वर्षाची प्रलंबित मागणी पुर्ण होऊन आरोग्य सेवा ग्रामीण भागात पुराविली जाणार असल्याबद्दल गिरमाजी सुरेश केन्द्रे, सभापती सुनिल मडावी, महेश देवकते जनसत्याग्रह संघटनेचे लाला शेख, विविध गावाचे आजी-माजी सरपंच व भाजप पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी या शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. 
     तसेच सतत पाठपुरावा करून रूग्णालय विषयी होणारी समस्या मार्गी लावल्या बद्दल आमदार अॅड.धोटे यांचे आभार मानले आहे. हे ग्रामीण रुग्णालय होणार कि याला सुद्धा अश्वासनांच्या श्रेणीत बसवतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli