Today : 21:09:2019


शहिदांच्या स्मृत्यार्थ आज गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ

विदर्भ टाइम्स न्यूज, मुंबई :- सिमा सुरक्षा दलाच्या वतीने शहिदांच्या स्मृत्यर्थ आयोजित रॅलीचे आज गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केल सिमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. १४ नोव्हेंबर रोजी इंडिया गेट, नवी दिल्ली येथून या रॅलीचा प्रारंभ झाला आणि मुंबईत पोहोचण्यापूर्वी १४०० कि.मी. चा प्रवास त्यांनी पूर्ण केला. या रॅलीत विविध सुरक्षा दलांचे २५ जवान सहभागी असून त्यात १० दिव्यांग आहेत. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सिमा सुरक्षा दलाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आणि बीएसएफचे मुंबईशी असलेले नाते ही सांगितले. 
     बिएसएफचे पहिले महासंचालक हे मुंबईचे होते शांततेचा संदेश देण्यासाठी या रॅलीचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी बीएसएफचे आभार मानले. सहभागींना सन्मानचिन्ह देखील त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या नागरिकांची सुरक्षा भक्कम करण्यासाठी अनेक पावले सरकारने उचलली आहेत. सीसीटीव्हीचे मोठे जाळे, अद्ययावत तंत्रज्ञान, आणि एक समर्पित फोर्सवन आता सुसज्ज आहे. 
     भारताने वेळोवेळी आपली शक्ती जगाला दाखविली आहे. आमच्या देशाच्या विरोधात कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला तितकेच चोख उत्तर देऊन शत्रूला पराभूत करण्यास आपण सज्ज आहोत, हे वारंवार भारताने सिद्ध केले आहे. सर्व नागरिकांना माझे आवाहन असेल की त्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलांचे डोळे आणि कान म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
News - Mumbai | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli