Today : 09:07:2020


विज टॉवर ग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय परिपत्रक नुसार मोबदला देण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्याना घेराव करून निवेदन सादर

फिरोज पठाण, चिमूर :- रायपूर राजनादगाव वरोरा ट्रान्समिशन कंपनी ने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासाडी करीत टॉवर उभारणीचे काम केले व शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या केवळ भूलथापा दिल्या व शासकीय नियमाप्रमाणे मोबदला न दिल्याने संतप्त झालेल्या शेकडो  शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे नेते सचिन सोनटक्के व शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिह वर्मा यांचे नेतृत्वात घेराव करून निवेदन सादर केले.
     चिमूर तालुक्यातील चिचघाट, येरखंडा, खडसंगी, आमडी, शिवापूर बंदर, शिवरा ,गदगाव, मागलगाव, शिरसपूर, पिटीचुवा, रेगाबोडी, तिरखुरा, मिन्झरी, भिवकुंड, शेंडेगाव, वाहानगाव, खैरी व शंकरपूर येथील शेतकऱ्यांचा समावेश होता.
     उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार कंपनी ने दडपशाही करून पोलिसांचा वापर करीत शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. शासनाच्या ३१ जून २०१७ च्या निर्णयानुसार मोबदला दिला जात नसल्याचे  नमूद केले आहे.  निवेदनात कंपनी ने शेतकऱ्यांची सभा घेऊन मोबदला बाबत स्पष्ट भूमिका घ्यावी असेही म्हटले असून कंपनी ने दडपशाही चा वापर करू नये अन्यथा होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असे म्हटले आहे. 
     सदर निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अप्पर सचिव, राज्यपाल, उर्जामंत्री, व्यवस्थापकीय संचालक मरावीम, तसेच महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनी, विज निर्मिती कंपनी, पावर ग्रीड कार्पोरेसन ऑफ इंडिया, अप्पर सचिव महसूल मंत्रालय मुबई, अप्पर मुख्य सचिव वित्त मंत्रालय मुबई व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आल्या आहे.  
 निवेदन देताना टॉवर प्रभावित शेतकऱ्यांचे नेते सचिन सोनटक्के ,शिवसेना तालुका प्रमुख धर्मसिह वर्मा , रामेसवर ढोने ,अमृत ननावरे, रमेश कोलते, सुशीला ननावरे, दिवाकर गायकवाड , गोपीचंद खाद्यसंग, रामदास शंभरकर,,तुळशीराम गायकवाड ,रामेशववर ढोये,अशोक शंभरकर,  गोविंदा रोकडे, तातोबा चट्टे, श्रीकृष्ण वाकडे, रामेसवर मांडवकर, कल्पना चंदेल, चंद्रभान वाकुलकर, मधुकर भोयर , अविनाश घाटे, संजय चौधरी आदी चा समावेश होता




News - Chandrapur | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli













































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

2018-01-08 | News | Chandrapur

चिमुर :- चिमुर तालुक्यातील कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ४९ वी पुण्यतिथी आयोजीत करण्यात आली. या कार्यक्