Today : 04:07:2020


भाजप तर्फे संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन

सय्यद मुमताज अली, गडचांदुर :- कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव येथील तुकडोजी माहाराज चैक येथे संविधान दिनाचे औचित्य साधुन कोरपना तालुका भाजपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष स्थानी भाजपचे तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच नारायण हिवरकर होते. भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून हिवरकर यांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
     यावेळी प्रमुख  पाहुणे म्हणून प्रविण ढासले, इश्वर खनके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल गेडाम, बंडु भोयर, भाजप शाखा अध्यक्ष मंगल बावणे, किशोर मालेकर, दुशंता मानुसमारे, राजु येरेकर, दिनकर पेचे आदि मान्यवरांची  उपस्थिती होती.
     संविधानाचे जनक, भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्य घटना लिहुन २६ नोव्हेंबर रोजी देशाला अर्पण केली. याच संविधानावर आज देशाची वाटचाल सुरू असल्याचे मत हिवरकर यांनी व्यक्त केले. उपस्थित  मान्यवरांनी सूद्धा बाबासाहेबांच्या जिवनावर प्रकाश टाकले. विलास पावडे, प्रमोद कौरासे, प्रविण भोयर, संतोष पेचे, सुधाकर कव्वलवार, जगदीश पावडे, सुरेश मडावी, पिंटु गेडाम, नितेश पावडे, प्रकाश मेश्राम आदिंनी कार्यक्रमाच्या सफलते साठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन राजु येरेकर तर आभार संदिप भोयर यांनी व्यक्त केले.
News - Chandrapur | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाई