Today : 11:07:2020


शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन श्रमिक एल्गारचा जिवती वन कार्यालयावर भव्य माेर्चा (रानटी डुक्करांमुळे हाेणारे नुकसान थांबवा / शेतकऱ्यांना तात्काळ साैरकुंपन देण्यात यावे) - अॅड. पाराेमिता गाेस

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :- जिवती येथिल वनपरिक्षेत्र कार्यालयावर आज श्रमिक एल्गारच्या वतीने माेर्चा काढण्यात आला. माेर्चाचे नेतृत्व अॅड. पाराेमिता गाेस्वामी यांनी केले माेर्चाला मार्गदर्शन करताना अॅड.गाेस्वामी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न शासनमान्य असुन यांच्या पिकांचे नुकसान संघटना खपवुन घेणार नाही. जिवती तालुक्यात रानटी डुक्करे नसल्याची खाेटी माहीती फाॅरेस्ट अधिकारी देताता. मात्र प्रत्यक्षात या डुक्करांमुळे पिकांची प्रचंड नुकसान हाेत असल्याने शासनाने गंभिरतेने विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या समजुन घ्याव्या, तसेच सरपणासाठी महिला काड्या अाणतात त्यांच्या कडुन फाॅरेस्ट अधिकारी वसुली करत असल्याची धक्कादायक माहिती समाेर अाणुन, सरकारची तिजाेरी खाली झाल्याने मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुट दिल्याची टिकाही ताईंनी शासनावर आपल्या भाषणातुन केली आहे.
     माेर्चा तहसिल कार्यालय ते वनपरीक्षेत्र कार्यालय असा काढण्यात आला होता तसेच माेर्चा वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडकताच संघटनेचे महासचिव घनशाम मेश्राम यांनी भाषनातुन शेतकऱ्यांच्या मागण्यावर प्रकाश टाकला, तालुका अध्यक्ष जालीम काेडापे, विमल काेडापे, माराेती सिडाम, गाैरुबाई काेटनाके यांची भाषने झाली. वनपरीक्षेत्र अधिकरी आडकिने यांनी निवेदन स्विकारले व निवेदनातील मागण्या शासनाकडे पाठवुन पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही मोर्चेकरांना दिली.
     रानटी डुक्करांचा बंदाेबस्त करण्यात यावा, शेतकऱ्यांनाशेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतीला विनामुल्य साैर कुंपन देण्यात यावे, ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळाऊ लाकुड उपलब्ध करुन द्यावे, वनविभागाने गॅस वाटपच्या नावावर गावकऱ्यांकडुन वर्गणी जमा केली असुन तात्काळ गॅस देण्यात यावे, या मागण्या निवेदना द्वारे करण्यात आल्या. मोर्च्यात गुडशेला, नागापुर, धाेंडा अर्जुनी, दमपुर माेहदा, शेडवाही, गडपांढरवनी, कलईगुडा, खडकी रायपुर, पल्लेझरी, आसापुर, लिंगणडाेह, नंदप्पा, पांडरवाणी, भुरीयेसापुर, लांबाेरी, येल्लापुर, येरमियेसापुर, काकबन, जिवती येथील शेकडाे शेतकरी या भव्य मोर्चात सहभागी झाले हाेते.
     संचालन महासचिव छाया सिडाम तर मार्चाचे यशस्वीतेसाठी सुरेश काेवे, पाेचु सिडाम, यशवंत रायसिडाम, परशुराम वेलादी व ईतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले व राष्ट्रगीताने माेर्च्याचा समारोप करण्यात आला.
News - Chandrapur | Posted : 2017-11-27


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliविद्यार्थी जेवढा संघर्ष करेल, तेवढा पुढें जाईल : न्यायमूर्ती गिरटकर

2018-01-08 | News | Chandrapur