Today : 16:02:2020


राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश रामगुंडे यांच्या प्रयत्नाने अखेर विज टॉवरचे काम बंद

फिरोज पठाण, चिमूर :- रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन कंपनीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासाडी करीत टॉवर उभारणीचे काम केले व शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या केवळ भूलथापा दिल्या व शासकिय नियमाप्रमाणे मोबदला न दिल्याने संतप्त झालेले होते येरखेडा येथील एका शेतकऱ्यांने टॉवर बांधकाम अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या मदतीने दडपशाही करून पोलिस स्टेशनमध्ये ठेवले होते या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी तात्काळ संबंधित यंत्रणेशी माहिती देऊन विज टॉवरचे काम बंद केल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले. 
     चिमूर तालुक्यातील चिचघाट, येरखंडा, खडसंगी, आमडी, शिवापूर बंदर, शिवरा, गदगाव, मागलगाव, शिरसपूर, पिटीचुवा, रेंगाबोडी, तिरखुरा, मिन्झरी, भिवकुंड, शेंडेगाव, वाहानगाव, खैरी व शंकरपूर येथील शेतकऱ्यांचा समावेश होता.
     उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार कंपनी ने दडपशाही करून पोलिसांचा वापर करीत शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही शासनाच्या  ३१ जून २०१७ च्या निर्णयानुसार मोबदला दिला जात नसल्याचे  नमूद केले आहे. निवेदनात कंपनी ने शेतकऱ्यांची सभा घेऊन मोबदला बाबत स्पष्ट भूमिका घ्यावी असेही म्हटले असून कंपनी ने दडपशाही चा वापर करू नये अन्यथा होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असे म्हटले आहे. 
     येरखेडा येथील शेतकऱ्याच्या शेतात काम चालू असताना काम अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या नजर कैदेत ठेवले होते याची माहिती मिळताच राष्ट्वादी किसान सभा जिल्हा अध्यक्ष सुरेश राम गुंडे यांनी महसूल व पोलीस यंत्रणेशी संपर्क करून शेतकऱ्यावरील अन्याय दडपशाही खपूवन घेणार नसल्याची तंबी दिली होती. तेव्हा टॉवर काम बंद झाले त्यामुळे सुरेश रामगुंडे च्या प्रयत्नाला यश आले असल्याचे सागत ते म्हणाले  कि, शासकिय परिपत्रक नुसार मोबदला मिळेपर्यत संघर्ष करणार असल्याची माहिती दिली. 
     यावेळी टॉवर प्रभावित शेतकऱ्यांचे नेते सचिन सोनटक्के राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे, योगेश ठुने, रामेश्वर ढोने, अमृत ननावरे, रमेश कोलते, सुशिला नन्नावरे, दिवाकर गायकवाड, गोपीचंद खाद्यसंग, रामदास शंभरकर, तुळशिराम गायकवाड, रामेशववर ढोये, अशोक शंभरकर,  गोविंदा रोकडे, तातोबा चट्टे, श्रीकृष्ण वाकडे, रामेसवर मांडवकर, कल्पना चंदेल, चंद्रभान वाकुलकर, मधुकर भोयर, अविनाश घाटे, संजय चौधरी आदिचा समावेश होता.
News - Chandrapur | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli